अक्षर क्रांती साहित्य महोत्सवाच्या अध्यक्षपदी सुरेश पाचकवडे....
विश्वाप्रभात न्यूज ब्युरो
18 Oct 2024, 1:28 PM
अक्षरक्रांती फाउंडेशन व कला गौरव संस्था नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दि. २८ आणि २९ डिसेंबर २०२४ रोजी नागपूरच्या रेशीमबाग मधील महात्मा फुले शिक्षण संस्थेच्या सांस्कृतिक सभागृहात संपन्न होणार्या आंतरराष्ट्रीय साहित्य महोत्सवाच्या अध्यक्षपदी अकोला येथील ज्येष्ठ साहित्यिक सुरेश पाचकवडे यांची निवड करण्यात आली आहे . सदर आंतरराष्ट्रीय साहित्य महोत्सवात जपान आणि अबुधाबीचे साहित्यिक उपस्थित राहणार आहेत .
सुरेश पाचकवडे यांनी यापूर्वी शुभम बालसाहित्य संमेलन , अंकुर साहित्य संमेलन , सृजन साहित्य संमेलन आणि कलाविष्कार साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषविले आहे . अक्षर क्रांतीच्या या पहिल्या साहित्य महोत्सवाचा बहुमान त्यांना मिळाला आहे. सुरेश पाचकवडे यांच्या कथा - कवितांची सहा पुस्तके प्रकाशित असून महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट वाड्मय पुरस्कारासह विविध पुरस्कार त्यांच्या पुस्तकांना प्राप्त झाले आहेत. अमरावती विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात त्यांच्या कवितेचा समावेश आहे . जिल्हा मराठी भाषा समितीचे ते अशासकीय सदस्य, विदर्भ साहित्य संघ शाखा अकोलाचे उपाध्यक्ष , लोकस्वातंत्र पत्रकार महासंघाचे सल्लागार आणि साद बहुद्देशीय संस्थेचे ते कार्याध्यक्ष आहेत. अक्षरक्रांती फाउंडेशनचे अध्यक्ष शंकर घोरसे , कला गौरव संस्थेचे अध्यक्ष डॉ. संगीता मानेकर , बानाईत , प्रभाकर तांडेकर , गणेश भाकरे , बाबा निमजे , सय्यद अमीन सह इतर मंडळी हा महोत्सव साजरा करण्यासाठी कार्यरत आहे .
Post Views: 20