तेल्हारा तालुक्यातील प्रगतशील,प्रयोगशील शेतकरी, उद्यानपंडीत सचिन गजाननराव कोरडे पाटील यांचे शेतात तूर पिकावर ट्रॅक्टर द्वारे औषध फवारणी करण्यात आली. ट्रॅक्टर द्वारे औषध फवारणीमुळे शेतकऱ्यांचा वेळ व पैसा दोन्ही वाचतो व पिकावर शंभर टक्के फवारणी योग्य होऊन अधिक उत्पन्न मिळण्यास मदत होते असे मनोगत यावेळी सचिन कोरडे यांनी व्यक्त केले.
सचिन कोरडे पाटील यांच्या फवारणी करतेवेळी बरेच शेतकरी उपस्थित होते.
(छाया - मनोज भगत)
Post Views: 81