सागर लोडम यांना लोकस्वातंत्र्य प्रभावी पत्रकारिता सेवा गौरव पुरस्कार
लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचा पत्रकार दिन सोहळा उत्साहात संपन्न
अकोला : आद्य पत्रकार स्व. बाळशास्त्री जांभेकर जयंती व पत्रकार दिनानिमित्त लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या राष्ट्रीय व अकोला जिल्हा कार्यकारिणीच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेला पत्रकार सन्मान, मार्गदर्शन व वैचारिक परिसंवादाचा कार्यक्रम आज अकोला येथे उत्साहात संपन्न झाला.
या कार्यक्रमात समाजहितासाठी सातत्याने प्रभावी पत्रकारिता करणारे पत्रकार सागर लोडम यांना त्यांच्या उल्लेखनीय योगदानाबद्दल ‘लोकस्वातंत्र्य प्रभावी पत्रकारिता सेवा गौरव’ या राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. लोकशाही मूल्यांचे रक्षण, संविधानिक हक्कांची जपणूक आणि अन्यायाविरुद्ध निर्भीडपणे आवाज उठविणाऱ्या त्यांच्या पत्रकारितेची दखल म्हणून हा सन्मान देण्यात आला.
कार्यक्रमाचे अध्यक्षपद ज्येष्ठ पत्रकार तथा लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष मा. प्रदीप खाडे यांनी भूषविले. प्रमुख अतिथी म्हणून मा. हर्षवर्धन पवार, जिल्हा माहिती अधिकारी, अकोला उपस्थित होते. संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष मा. संजय एम. देशमुख यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
यावेळी समाजाला अपेक्षित असणारा पत्रकार कसा असावा? या विषयावर आयोजित परिसंवादात पत्रकारितेची सामाजिक जबाबदारी, मूल्यनिष्ठा, निर्भीडता व सत्यनिष्ठा यावर सखोल विचारमंथन झाले. ज्येष्ठ पत्रकार प्रा. मोहन खडसे, दिनेशजी शुक्ल, निशाली पंचगाम (पत्रकार व आकाशवाणी उद्घोषिका), माणिकराव कांबळे, तसेच हास्यकवी ॲड. अनंतराव खेडकर, ज्येष्ठ पत्रकार महेंद्र कविश्वर, धनंजय मिश्रा, पुष्पराज गावंडे, राजेंद्र देशमुख, सागर मोदी यांनी आपल्या विचारांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमात महापुरुषांना अभिवादन व सामूहिक श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. तसेच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रभावी कार्य करणाऱ्या अकोल्यातील विविध पत्रकारांना ‘लोकस्वातंत्र्य पत्रकार भूषण सेवा गौरव’ व ‘लोकस्वातंत्र्य प्रभावी पत्रकारिता सेवा गौरव’ या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. जया भारती इंगोले सौ. दिपाली बाहेकर यांनी केले. कार्यक्रमाचे यशस्वी व्यवस्थापन अंबादास तल्हार, पंजाबराव वर, श्रीकृष्ण माळी, दिलीप नवले, सतीश देशमुख, मनोहर मोहोड व इतर पदाधिकाऱ्यांनी केले. संघटनशक्ती, आपसातील स्नेहबंध आणि समाजाभिमुख पत्रकारिताच लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या सेवाभावी वाटचालीचा मूलमंत्र असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.
Post Views: 14