जिल्हास्तरीय साहित्य संमेलने साहित्यिकांसाठी ऊर्जादायी - डॉ.ज पा खोडके


 संजय देशमुख  14 Dec 2021, 4:29 PM
   

अकोला : तरुणाई फाउंडेशन कुटासा यांच्यावतीने आयोजित दुसरे अकोला जिल्हा स्तरीय साहित्य संमेलन स्वर्गीय अरविंद भोंडे साहित्यनगरी शिवाजी महाविद्यालय अकोला येथे उत्साहात संपन्न झाले.  संमेलन अध्यक्ष डॉ.ज पा खोडके यांनी जिल्हास्तरीय साहित्य संमेलने साहित्यिकांसाठी ऊर्जादायी असल्याचे प्रतिपादन आपल्या अध्यक्षीय भाषणात केले. जिल्ह्यातील साहित्य चळवळ गतिमान करण्यामध्ये तरुणांनी फौंडेशनचे कार्य उल्लेखनीय आहे. नवीन साहित्यिकांची दर्जेदार फळी निर्माण करण्यासाठी तरुणाई फाउंडेशन कार्य करीत आहे ही जिल्ह्यासाठी आशादायी बाब आहे. उद्घाटन समारंभाला उद्या टीका प्राध्यापक डॉक्टर ममता ताई इंगोले, स्वागताध्यक्ष प्राध्यापक देवानंद गावंडे, आमदार अमोल मिटकरी, लोककवी विठ्ठल वाघ प्राध्यापक डॉक्टर संतोष हुसे, पुष्पराज गावंडे सदस्य महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ मुंबई) प्राचार्य अंबादास कुलट, अविनाश देशमुख, प्रा डॉ सुलभा खर्चे शिवराज जामोदे हिम्मत ढाळे माजी संमेलनाध्यक्ष माननीय बापुरावजी झटाले तरुणाई चे संस्थापक संदीप देशमुख आदींची विचारपीठावर उपस्थिती होती. उद्घाटन सत्राचे संचालन जया भारती यांनी तर आभार गणेश मेनकर यांनी केले.

शिवराज जामोदे यांनी लोक कवी विठ्ठल वाघ यांची प्रकट मुलाखत घेतली मुलाखतीदरम्यान विठ्ठल वाघ यांनी साहित्यिकांनी सजग होऊन लिहिण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे असे प्रतिपादन केले, दुसऱ्याचे पाहून दुसऱ्या सारखे लिहिण्यापेक्षा स्वतःचे अनुभव साहित्यामधून आले पाहिजे असे विठ्ठल वाघ यांनी याप्रसंगी तरुणांना सांगितले, डॉ किरण वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या परिसंवादामध्ये प्रमुख पाहुणे प्रा डॉ संतोष हुसे, धनंजय मिश्रा चंद्रकांत झटाले शरद वानखेडे होते. महाराष्ट्र सरकारने मराठी भाषा सक्तीची केल्याबद्दल साहित्यिकाच्या वतीने सरकारचे आभार मानण्यात आले.  गझल मुशायऱ्याच्या सत्राचे अध्यक्ष सुप्रसिद्ध गझलकार किशोर बळी होते, सुनील कोळी प्रमुख पाहुणे अमोल शिरसाट आणि निलेश कवडे उपस्थित होते, 
अंकुराने उघडले नुकतेच डोळे  घातली डोळ्यात माती पावसाने अशा दर्जेदार शेरोशायरी सह सतीश दराडे यांनी मुशायऱ्याचे बहारदार निवेदन केले. गझल मुशायर्‍यात डॉक्टर सुजाता मराठे मिलिंद हिवराळे अभिषेक उदावंत मंगेश गजभिये दिनेश गावंडे पंकज कांबळे यांचा सहभाग होता.ज्येष्ठ साहित्यिक तुळशीरामजी बोबडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या कवी संमेलनाच्या सत्रामध्ये प्रमुख पाहुणे श्याम ठक, प्रा. सदाशिव शेळके, प्रा संजय कावरे, कविता राठोड शिवलिंग काटेकर होते.
कवी संमेलनामध्ये धीरज चावरे गजानन छबिले राम हरी पिंपळकार, सुनील दिवनाले निलेश देवकर , सुनील लव्हाळे, सुमेध वानखडे,  महादेव लुले गजानन काळे गोपाल मुकुंदे संतोष इंगळे वैभव इंगळे राजाभाऊ देशमुख, अजय इंगळे शंकरराव सांगळे प्रशांत वरईकर  आधी कवींनी आपल्या बहारदार रचना सादर केल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशांत भोंडे यांनी केले
संमेलनाचा समारोप संमेलनाध्यक्ष  डॉ. ज पा. खोडके यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले समारोपीय सत्राला प्रमुख पाहुणे रमेश थोरात मनोहर नागे संजय देशमुख सदाशिव शेळके डॉ. निलेश पाटील राजेंद्र झामरे अनिल लव्हाळे रामेश्वर बरगट आदींची प्रमुख उपस्थिती होती. समारोपीय सत्राचे सूत्रसंचालन संदीप देशमुख यांनी तर आभार  वरईकर यांनी मानले. 
साहित्य संमेलनाच्या यशस्वीतेसाठी राम हरी पिंपळकार गणेश मेनकर विपुल लिंगोट संतोष इंगळे, गजानन छबिले ऍड अनिल लव्हाळे यांच्यासह आयोजन समितीच्या सदस्यांनी अथक परिश्रम घेतले.

    Post Views:  268


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व