महिलाश्रम हायस्कूल मध्ये दीपोत्सव


 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  26 Oct 2022, 1:40 PM
   

महिलाश्रम हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, व्यवसाय शिक्षण विभाग, कर्वेनगर, पुणे येथे मोठ्या उत्साहात दीपोत्सव साजरा करण्यात आला. दीपोत्सवाचे उद्घाटन कार्याध्यक्ष रवींद्र देव व उपकार्याध्यक्ष विद्या कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्राचार्या शोभा कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय राष्ट्रध्वजाचा इतिहास, सातवाहन  व होळकर घराण्याचा इतिहास, इंग्रजीतील मराठी कादंबरीकार, स्वातंत्र्य लढ्यातील महिला क्रांतिकारक, शास्त्रज्ञ, पश्चिम घाटातील प्राणी, वनस्पती व पक्षीजीवन यांची सचित्र माहिती, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त चित्रकला प्रदर्शन यांचेआयोजन करण्यात आले. प्रशालेच्या आवारामध्ये व भारतरत्न महर्षी कर्वे समाधीस्थळाजवळ  संपूर्ण परिसर फुलांच्या रांगोळीने सुशोभित करण्यात आला. पणत्या लावण्यात आल्या.
यावेळी संस्थेचे कार्याध्यक्ष रवींद्र देव, उपकार्याध्यक्षा विद्या कुलकर्णी, व्यवस्थापक मंडळ सदस्य सीमा कांबळे, अभय कुलकर्णी, सचिव डॉ. पी.व्ही.एस शास्त्री, उपसचिव प्रदीप वाजे, गिरीश हुद्दार, महिलाश्रम हायस्कूलच्या प्राचार्या शोभा कांबळे, उपमुख्याध्यापक विष्णू मोरे, उपप्राचार्य विजय गायकवाड, पर्यवेक्षक संताजी चव्हाण, संजय रायपूरकर, व्यवस्थापक मंडळ शिक्षक- सेवक प्रतिनिधी प्रसाद नगरकर,व्हिजन इंग्लिश मीडियम स्कूलच्या मुख्याध्यापिका कांचन सातपुते, श्रीपाद कुलकर्णी,प्रदीप जोशी,वैशाली पोतदार, प्रशालेतील सर्व विद्यार्थिनी, शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

    Post Views:  358


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व