बाल कल्याण समिती व जिल्हा बाल संरक्षण कक्षांचे प्रयत्न
पश्चिम बंगाल येथील हरवलेली बालिका पालकांच्या स्वाधीन
विश्वाप्रभात न्यूज ब्युरो
30 Nov 2022, 8:39 AM
पश्चिम बंगाल येथून हरवलेली १७ वर्षीय ही सोमवार दिनांक २८/११/२०२२ रोजी बाल कल्याण समिती व जिल्हा बाल संरक्षण कक्ष अकोला यांच्या प्रयत्नाने त्यांच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात आले. अकोला रेल्वे स्थानकावर लोहमार्ग पोलीस यांना एक बालिका विना पालक रेल्वे स्टेशनवर आढळून आली , बालिकेची भाषा ही बंगाली असल्यामुळे ती भाषा पोलिसांना कळत नव्हती . काळजी व संरक्षणाच्या दृष्टिकोनातून बालीकेस बालकल्याण समिती अकोला यांचे आदेशाने आनंद बालिकाश्रम येथे दाखल करण्यात आले होते. जिल्हा बाल संरक्षण कक्षाचे सुनील लाडुलकर यांनी बंगाली भाषा अवगत असणारे दुभाषिक व्यक्तीला त्या बालिकेशी वार्तालाप करणे करिता पाचारण केले. आनंद बालिकाश्रमच्या अधिक्षिका तपोधीरा दीदी यांच्या समक्ष बालिकेशी दोन ते तीन वेळा वार्तालाप करण्यात आला . तिने दिलेल्या माहितीनुसार गावांचा शोध गुगलद्वारा घेण्यात आला व ते गाव ज्या पोलीस स्टेशनअंतर्गत येते . त्या पोलीस स्टेशनच्या निरीक्षकांशी संपर्क साधण्यात आला व त्या पोलीस अधिकाऱ्यांसोबत भ्रमणध्वनी द्वारे संपर्क करून बालिकेचे संभाषण करून देण्यात आले . स्थानिक पोलिसांनी त्या बालिकेच्या कुटुंबाचा शोध घेतला . जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी विलास मरसाळे, जिल्हा परीक्षा अधिकारी गिरीश पुसदकर व जिल्हा बाल संरक्षण अधिकारी राजू लाडुलकर आणि बालकल्याण समिती यांच्या मार्गदर्शनाखाली शोध मोहीम राबविण्यात आली . बाल कल्याण समिती अध्यक्ष एड. अनिता गुरव आणि जिल्हा बाल संरक्षण कक्षाचे सुनील लाडुलकर हे स्थानिक पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मनोज महतो व बालिकेचे पालक यांच्या नियमित संपर्कात होते . जिल्हा बाल संरक्षण कक्षाचे सुनील लाडूलकर , बाल कल्याण समिती अध्यक्ष एड. अनिता गुरव व सदस्य राजेश देशमुख , प्रांजली जयस्वाल , डॉ. विनय दांदळे एड. शीला तोष्णीवाल , आनंद बालिकाश्रमच्या तपोधीरा दीदी व स्थानिक पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मनोज महतो यांच्या प्रयत्नातून एक हरविलेली बालिका कुटुंबात पोहोचली .
Post Views: 195