मुलांना घडविण्यात शिक्षकाची भूमिका महत्वाची! - प्राचार्य सतीश देशमुख
विश्वाप्रभात न्यूज ब्युरो
23 Dec 2025, 12:38 PM
अकोला : विद्यार्थी घडविण्यात पालकांइतकीच किंबहुना त्याहीपेक्षा महत्त्वाची भूमिका शिक्षकाची असते! कारण पालक आणि शिक्षक या दोन्ही भूमिका तो पार पाडत असतो!त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आयुष्यात प्राथमिक स्तरावरील शिक्षकाचे स्थान अती महत्वाचे आहे! असे मत ज्येष्ठ कवी तथा प्राचार्य सतीश देशमुख वेणीकोठेकर यांनी व्यक्त केले. ते उमग साहित्य संघ व माजी विद्यार्थी मंडळ यांचे वतीने आयोजित नुकेच निवृत्त झालेले विस्तार अधिकारी प्रताप वानखेडे यांच्या सत्कार सोहळा निमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते. आपल्या शिक्षकाच्या निवृत्ती निमित्त माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन त्यांच्या कार्याचा सन्मान करून आपली कृतज्ञता व्यक्त करावी! यातच त्यांच्या शिक्षण क्षेत्रातील कार्याचा सन्मान सिद्ध होतो. एका शिक्षकांसाठी हा सर्वाच्य सन्मान आहे असे मत व्यक्त करून पुढील कार्या साठी त्यांनी शुभेच्छा व्यक्त केल्या. कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानावरून ते बोलत होते. विशेष अतिथी म्हणून माजी मंत्री मा. दशरथ भांडे, प्रसिद्ध कवी किशोर बळी, नितीन धांडे, मालतीबाई वानखेडे आदी मान्यवर उपस्थित होते. या प्रसंगी मान्यवरांचे हस्ते उमग, विशेषांकाचे प्रकाशनही करण्यात आले.
कार्यक्रमाचे यशस्वितेकरिता वानखेडे सरांचे माजी विद्यार्थी व उमग साहित्य संघाचे संपादक मंडळातील डॉ. संघरक्षित गोपनारायण, संदीप चंदन, निलेश कळसकर, रवींद्र पाठक, जयश गोपनारायण,संदीप तिडके, आदी घुसर, कंचनपूर ,खडकी टाकली येथील
माजी विद्यार्थी यांनी प्रयत्न केले. सूत्र संचालन रवींद्र पाठक यांनी तर संघरक्षित गोपनारायण यांनी आभार व्यक्त केले!
Post Views: 13