वानखेड ते वरवट बकाल रस्ता निकृष्ट होत असल्याची ग्रामस्थांची तक्रार
दर्जेदार रस्ता न बनवल्यास शेतकरी आणि ग्रामस्थांचा उपोषणाचा इशारा..
संग्रामपूर- संग्रामपूर तालुक्यातील ग्रामा-97 वानखेड ते वरवट ह्या पोच रस्त्याची सुधारणा करण्यासाठी बांधकाम विभागाअंतर्गत निविदा मंजूर झालेल्या ठेकेदाराने रस्त्याची सुधारणा करण्याचे काम चालू केले. परंतू हे काम निकृष्ट होत असल्याचे दिसून येते. कारण त्या रस्त्यावर काही ठिकाणी योग्य मुरूम तर काही ठिकाणी वाण नदी पात्रातून अवैधपणे मोठमोठे खड्डे करून शेकडो ब्रास रेती मिक्स रुढीचे उत्खनन होत आहे. शासनाची लाखो रुपयाची फसवणूक केली जात आहे.. वानखेड ते वरवट चालू असलेल्या संबंधित रस्त्यावर अवैध रेती मिक्स रुढी टाकण्यात आली. त्या रेती मिक्स रुढीमुळे शेतात जाण्याचा कायमस्वरूपी रस्ता हा निकृष्ट दर्जाचा होत आहे .
त्याचप्रमाणे वाननदी पात्रातून सुध्दा विनापरवानगी मोठमोठे खड्डे करून अवैध रेतीमिक्स रूडी रोडवर टाकण्यात आली असून रोडवर टाकलेल्या शेकडो ब्रास अवैध रेतीमिक्स रुळीची माहिती संबंधित शेतकऱ्यांनी सदर माफिया ठेकेदारावर कार्यवाही होऊन महसूल जमा व्हावा म्हणून संग्रामपूरचे तहसीलदार योगेश्वर टोम्पे यांना दिनांक 22 मार्च रोजी दिलेली आहे. फोटोसह व्हिडिओ शूटिंग दाखवलेली आहे. त्यावर तलाठी व मंडळ अधिकारी यांनी दिलेल्या अहवालात स्पष्ट दिसून येते की सदर रस्त्याच्या कामात अवैध रेतीव रूढीचा वापर करण्यात आला.
सदर रस्त्याचे काम हे निकृष्ट होत असल्याच्या बातम्या सुवृत्तपत्रात सुध्दा प्रसिद्ध झालेल्या आहेत. तरी सुद्धा अद्यापही संबंधित बांधकाम विभागाकडून कुठलीही कारवाई होत असल्याचे दिसून येत नाही.सदर रस्त्याचा पंचनामा करून पाहणी करावी. संबंधित ठेकेदारावर कार्यवाही करून शासनाची फसवणूक करणाऱ्या ठेकेदारावर व संबंधित अधिकाऱ्यांवर लवकरात लवकर कार्यवाही न झाल्यास शांततेच्या मार्गाने आमरण उपोषण करण्यात येईल असा इशारा शेतकऱ्यांनी निवेदनातून दिला आहे.
या नित्कृष्ट रस्त्यामुळे निर्माण होणाऱ्या अडचणींबाबत संबंधित अधिकारी हे जबाबदार राहतील. अशा इशारा वानखेड येथील ग्रामस्थानी कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग खामगाव यांच्याकडे एका तक्रारीतून दिलेला आहे.
Post Views: 151