हिरकणी महिला बचत गट महोत्सवाचे आयोजन भरगच्च गर्दीने यशस्वी
देशमुख महिला मंडळाचा एक उल्लेखनिय उपक्रम
विश्वाप्रभात न्यूज ब्युरो
18 Oct 2022, 1:20 PM
अकोला - समाजातील महिलांनी ईतर महिलांना प्रोत्साहन देऊन,मदतीचा हात देऊन आर्थिक स्वावलंबनाची दिशा दाखवावी.यातून व्यापक प्रमाणात समाजाचा विकास होऊन उद्योग क्षेत्रात महिला सुध्दा पुरूषांच्या बरोबरीने आपले व्यावसायिक कौशल्य सिध्द करू शकतात हे सिध्द होईल असे उद्योग जागृती पर आवाहन सुप्रसिद्ध उद्योजिका सौ.वंदना सराग यांनी हिरकणी प्रदर्शनीच्या उद्घाटनप्रसंगी केले.बचत गट व लघूव्यवसायिक महिलांना प्रोत्साहन देऊन त्यांची उत्पादने घराघरात पोहचावित.यातून आर्थिक पाठबळाने महिला व्यवसायात सक्षम होण्यासाठी उद्यमशिलतेला चालना देणाऱ्या हिरकणी महिला बचत गट महोत्सवाचे आयोजन दि.१५ व १६ आक्टोबरला करण्यात आले होते.या प्रदर्शनीला अकोला शहर आणि गावागावातून असंख्य महिलांनी भेटी देऊन खरेदीसाठी गर्दी केली.तर शहरातील सामाजिक,सांस्कृतिक आणि विविध क्षेत्रातील व मान्यवरांनी आणि लोकप्रतिनिधींनी सुध्दा या प्रदर्शनीला भेट देऊन मुक्तकंठाने केलेल्या प्रशंसा हे या महोत्सवाच्या यशस्वीतेचे एक अनुमान ठरलेले आहे.
अकोला येथील देशमुख महिला मंडळाने स्थानिक जिल्हा परिषद भवनमध्ये या प्रदर्शनीचे आयोजन केले होते.यामध्ये दिवाळीतील खाद्य पदार्थ, ज्वेलरी, कपडे, साड्या, सौंदर्य प्रसाधने, गृहउपयोगी वस्तू, सजावटीच्या वस्तू अशा अनेक स्टॉलचा समावेश होता. राज्यस्तरीय महिला मेळावा आणि सलग असंख्य उपक्रमातून या महिला मंडळाने सक्षम महिलाशक्तीची एक आगळी वेगळी ओळख समाजासमोर ठेवली आहे.
अभिमास्पद आणि कौतुकास्पद वाटचाल करणाऱ्या देशमुख महिला मंडळाच्या या प्रदर्शनीचे उद्घाटन सुप्रसिध्द उद्योजिका समृध्दी क्रिएशनच्या संचालिका वंदना सराग यांचे हस्ते करण्यात आले.याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून सौ.सुहासिनीताई धोत्रे,सौ.मंजुषाताई सावरकर,तर निर्माण मल्टीस्टेट चे उपाध्यक्ष श्री.के.जी.देशमुख होते.
यावेळी सातारा येथील जेष्ठ पत्रकार लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे कार्याध्यक्ष श्री.बाळासाहेब आंबेकर, लोकस्वातंत्र्यचे संस्थापक व अकोला जिल्हा देशमुख समाजसेवा मंडळाचे अध्यक्ष श्री संजय एम.देशमुख, जेसिस क्लब अध्यक्ष अरूणबाप्पू देशमुख,रेखाताई खंडेलवाल,लिनेस क्लब अध्यक्षा सुरेखा गुप्ता,सौ.सुनिता खंडेलवाल,अ.भा.मारवाडी महिला मंडळ अध्यक्षा सौ.कविता टावरी,निर्माणचे श्री गजानन खोटरे,राजेन्द्रजी देशमुख,प्रदिप गुरूखुद्दे,यांची विशेष उपस्थिती होती.
या महोत्सवातील महिलांना प्रोत्साहन देऊन त्यांच्या उद्योगशीलतेला शुभेच्छा व्यक्त करण्यासाठी देशमुख जागृती मंडळाचे सचिव नितीन देशमुख, सहकोषाध्यक्ष अश्विन देशमुख,शरद वानखेडे, सौ.पुष्पाताई खंडेलवाल,डॉ.सीमा तायडे,सौ.अरूंधती सिरसाठ,सौ.अर्चना शर्मा,यांनी सदिच्छा भेटी देऊन या उपक्रमाचे कौतुक केले.
समारोपाच्या कार्यक्रमांमध्ये श्री अविनाश देशमुख,अभयदादा पाटील,चला हवा येऊ द्या मधील कीशोर बळी,डॉ.दत्ता देशमुख,पत्रकार चंद्रकांत झटाले,ठाकरे,यांनी विशेष उपस्थिती देऊन सदिच्छा व्यक्त केल्या.या उपक्रमाला निर्माण मल्टीस्टेट क्रेडीट को.ऑप.सोसायटी,आर आर.सी नेटवर्क,चेतन ढोरे,हॉटेल सेंटर प्लाझा,जिल्हा परिषद भवनाचे व्यवस्थापन मंडळ,देशमुख महिला मंडळ सदस्यांचे विशेष सहकार्य लाभले.
हा महोत्सव यशस्वी करण्यासाठी देशमुख महिला मंडळाच्या जेष्ठ सल्लागार कविताताई ढोरे,अध्यक्षा सौ राजश्री देशमुख,उपाध्यक्षा सौ.नयना देशमुख,सचिव सौ.स्वप्नाली देशमुख,कोषाध्यक्ष सौ.प्रतिभा देशमुख,सौ.कल्पनाताई,सौ.पुजाताई,सौ.संध्याताई,सौ.सविताताई,सौ.साधनाताई,सौ.पुष्पाताई,सौ.वैशालीताई,सौ.निताताई, सौ.ज्योतीताई, सौ.इंदूताई, सुलभाताई, विद्याताई, संजीवनीताई, सौ.स्वप्ना, श्वेता, मनिषा, पोर्णिमा, शितल, तृप्ती, अश्विनी, अपेक्षा, उज्ज्वला, वैशाली, रोहिणी, ममता, सोनल, योगीनी, स्नेहल, शिल्पा, संगीता, विजयाताई, मंजुषा ताई, प्रिती, केतकी, अर्चना, अस्मिता, ऋतुजा, संध्या, प्राची,सुनिता, वैशाली, यांनी भरपूर परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सौ.नयना देशमुख यांनी तर आभारप्रदर्शन सौ.स्वप्नाली देशमुख यांनी केले.
Post Views: 236