जागतिक अपंग दिनाला अकोल्यात रॅली
दिव्यांग बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती
(मनोज भगत) अकोला : दरवर्षी प्रमाणे अकोला येथे महाराष्ट्र राज्य अपंग कर्मचारी संघटना जिल्हा शाखा अकोला व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अकोला चे संयुक्त विद्यमाने दिनांक ३ डिसेंबर २०२५ ला भव्य जागतिक अपंग दिनानिमित्त पूर्ण अकोला शहरातून भव्य रॅली काढण्यात आले आहे.
या रॅलीला दिगंबर लोखंडे साहेब अति.मुख्यकार्यकारी अधिकारी,मा.रोशनी बंसल मॅडम जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिव अकोला,मा.तुषार जाधव साहेब दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी, मा.दिलीप जाधव उपायुक्त मनपा, मा.हरिश्चंद्र ईटकर शिक्षणाधिकारी मनपा, मा .अरविंद सोनकांबळे अधिष्ठाता डॉ पं.दे.कृ.वि.अकोला,मा.दिनकरराव काळे राज्य संचालक तथा विदर्भनिरीक्षक, मा.संजय बरडे राज्य उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य अपंग कर्मचारी संघटना, या मान्यवरांच्या उपस्थितीत. कार्यक्रम मध्ये सेवानिवृत्त अपंग कर्मचारी/ अधिकारी मा दिलीप सरदार केंद्र प्रमुख,मा. जावेद इकबाल प.शि. मा. प्रकाश इंगळे स.शि.यांना जीवन गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
सोबतच दिव्यांग गुणवंत पाल्य व दिव्यांग गुणवंत खेळाडू यांचा गुणगौरव मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. मुख्य कार्यक्रम दिनांक ३ डिसेंबर २०१५ अपंग दिनानिमित्ताने सकाळी ११ वाजता संघटनेचे कार्यालय मुख्य पोस्ट ऑफीस जवळून नवीन बसस्थानक,गांधी चौक मार्गे,पंचायत समिती आदी मार्गाने शहरातून भव्य दिव्यांग रॅली काढण्यात आली.
या रॅली ला अकोला जिल्ह्यातील अधिकारी यांनी हिरवी झेंडी दाखवून उद्घाटन करण्यात आले. या रॅली चा समारोप झाल्यानंतर मनपा हिन्दी शाळा क्र ४ चिवचिव बाजार जवळ अकोला येथे मुख्य समारंभ घेऊन या कार्यक्रमाचे अध्यक्ष संघटनेचे राज्य उपाध्यक्ष संजय बरडे हे होते. तर या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी मा. रोशनी बन्सल सचिव जिल्हा विधी सेवा प्राधीकरण अकोला , मा दिगंबर लोखंडे अति, मुख्यकार्यकारी अधिकारी जि प अकोला , मा डॉ तुषार जाधव दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी जि प अकोला मा दिलीप जाधव उपायुक्त मनपा,तसेच मा दिनकरराव काळे राज्य संचालक व विदर्भ निरीक्षक म रा अपंग कर्मचारी संघटना, जिल्हा दिव्यांग सेलचे सचिन शेजव,जिल्हा सेलचे बाळा साहेब नेरकर मंचावर उपस्थित होते.
दुसऱ्या सत्रात दिव्यांगा साठी स्वयंरोजगार व कौशल्य विकासाच्या संधी या विषयांवर मा .प्रसन्न रत्नपारखी जिल्हा उद्योग व स्वयंरोजगार योजना याबाबत मार्गदर्शन केले. अंतिम सत्रात दिव्यांग उपवर वधूवर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.या सत्रात दिव्यांग परिचय मेळाव्यातून कु.जया संतोष विदोकार व मयुर ज्ञानेश्वर बारब्दे यांचा संमतीने विवाह लावून देण्यात आला कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आयोजन समितीचे संजय बरडे (अध्यक्ष ), मो अजिज (सचिव ) दिलीप सरदार (कोषाध्यक्ष ) प्रविण फुले , सुनिल वानखडे ,सुधीर कडू ,राजेश रौंदळे.रामेश्वर कवळे गणेश अत्तरकर, सुनिल कवळे, रविंद्र सिरसाठ, गणेश महल्ले, किशोर वानखडे,मनोज जयस्वाल, किशोर तायडे कु.माधुरी देठे, उज्वला शर्मा, शबाना पटेल, दिपाली रोठे, मिरा डिघोडे, अनुराधा शेंडे, शितल नैताम,शिल्पा वाघमारे, अर्चना देशमुख श्रीकांत देशमुख दिव्यांग बेरोजगार संघटना पदाधिकारी यांनी प्रयत्न केले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.
Post Views: 42