साधू संतांचे ग्रंथांचे तत्त्वज्ञान म्हणजे शांतीचा जिवंत झरा आहे - ज्येष्ठ समाजसेवक, प्रवचनकार डॉ.रवींद्र भोळे
विश्वाप्रभात न्यूज ब्युरो
12 Mar 2026, 8:33 AM
पुरंदर जेऊर : जगात कोणत्याही क्षेत्रात गुरु ग्रंथांशिवाय ज्ञान प्राप्त होत नाही . मनुष्य मिळालेल्या ज्ञानाचा वापर करून आर्थिक सुबत्ता व भौतिक सुख मिळवतो मात्र त्यामुळे अहंकार ,वासना निर्माण होऊन षडरिपू चा उदय होतो. व दया,धर्म लोप पावतो. फक्त आध्यात्मिक गुरुच व धर्मग्रंथ अभौतिक सुखाचे ज्ञान देऊन धर्म धारणा करण्याची शक्ती देतात, धर्मामुळे दया निर्माण होते व अहंकार संपतो. जीवनाचे ध्येय व जीवनाचे रहस्य साधुसंतांच्या तत्त्वज्ञानाद्वारेच कळते. खरे सुख व आनंदी जीवन जगण्यासाठी साधू संतांचे तत्त्वज्ञान व धर्मग्रंथ महत्वपूर्ण आहे, साधुसंतांच्या तत्त्वज्ञानामुळेच आत्मिक, मानसिक शांती प्राप्त होते, साधुसंतांचे ग्रंथांचे तत्त्वज्ञान म्हणजे शांतीचा जिवंत झरा आहे,असे मत ज्येष्ठ समाजसेवक ,प्रवचनकार डॉ. रवींद्र भोळे उरुळी कांचन यांनी येथे व्यक्त केले. वैकुंठवासी ब्रह्म मूर्ती ह भ प कृष्णा महाराज तांबे यांच्या प्रेरणेने व श्री संत तुकाराम महाराज बीज व श्री संत एकनाथ महाराज षष्ठी सोहळा निमित्ताने ह भ प ज्ञानेश्वर महाराज तांबे यांनी व अखंड हरिनाम सप्ताह जेऊर यांच्यावतीने येथे अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी उरुळी कांचन येथील ज्येष्ठ समाजसेवक प्रवचनकार ह भ प डॉ. रवींद्र भोळेयांच्या प्रवचनाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी प्रवचनात ते पुढे म्हणाले की मनुष्य जीवनभर विकर्म, कर्म, अकर्म करीत असतो. परंतु निष्काम कर्मयोग करून जीवनातील रहस्य शोधता येते व जीवन कसे जगावे याचा उलगडा होतो. जीवनभर शांती व मेल्यानंतर आत्म्याला मोक्ष प्राप्ती हेच जीवनाचे रहस्य आहे व हाच जीवनाचा उद्देश आहे. तसेच प्रत्येकाने नीतीने, न्यायाने , विवेकाने, अहंकार शून्य वागले पाहिजे.यावेळी खालील प्रमाणे ह भ प प्रवचनकार शंकर महाराज ठोंबरे, प्रियंका महाराज तांबे, वैभव महाराज धुमाळ, गोरक्षनाथ महाराज तांबे, ह भ प बापू महाराज गायकवाड वाघापूर, शर्मिला महाराज ,शिवाजी बरकेडेमहाराज,ह भ प बापूराव महाराज धायगुडे, जालिंदर महाराज कुंभार यांच्या प्रवचनाचेही आयोजन करण्यात आले होते. त्याचप्रमाणे सर्वस्वी ह भ प अनिकेत महाराज ठोंबरे कोपरडे, वंदनाताई महाराज काकडे थेऊर, ज्ञानेश्वर कृष्णा तांबे महाराज, दिव्याताई महाराज शिंदे जेजुरी,वैष्णवी ताई महाराज जाधव आळंदी, नारायण महाराज शिंदे लोणंद, मनोज महाराज साळुंखे पांडे यांचे सुस्राव्य कीर्तने झाली. त्याचप्रमाणे ह भ प गायनाचार्य सोमनाथ महाराज मोहिते यांचे काल्याचे किर्तन झाले. या कार्यक्रमाला अनेक मान्यवरांसह ह भ प बापू गायकवाड महाराज वाघापूरकर,आयोजक श्री ह भ प ज्ञानेश्वर महाराज तांबे, जनार्दन श्रीरंग तांबे, ओम प्रकाश संपत बरदडे, व गावातील अनेक प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. हा कार्यक्रम जेऊर तालुका पुरंदर जिल्हा पुणे येथे भव्य मंडपामध्ये संपन्न झाला.
Post Views: 18