जेष्ठ होमिओपेथिक डॉक्टरांचा सत्कार
अकोला : होमिओपैथी चिकित्सा पद्धति चे जनक डॉक्टर सैम्युअल हेनिमान यांनी समचिकित्सा पद्धति चे शोध लावले बरीच औषधीचे परीक्षण स्वतःवर केले व त्यांनी सिद्ध केले कि औषधाला सुक्ष्मीकरण केल्याने त्याची शक्ती जबरजस्त वाढते जी औषधी निरोगी व्यक्तित आजार निर्माण करू शकते तीच औषध तसेच लक्षण असलेले रूग्णाला दुरुस्त सुध्दा करू शकते हे तत्वज्ञान डॉ हेनिमान यांनी जगाला दिले आज संपुर्ण विश्वात होमिओपेथिक चिकित्सेचा जबरदस्त प्रचार प्रसार होत आहे कोरोना काळात होमिओपैथीक औषधी प्रतिबंधक रुपात देण्यासाठी आरोग्य मंत्रालय भारत सरकार ने पत्रक काढुन अभिसूचना दिली होती.
होमिओपैथी चे जनक यांनी आपले शरीर सोडण्यापूर्वी एक महत्वपूर्ण गोष्ट सांगितली मी व्यर्थ नाही जगलो त्यांची सेनफ्रांसिस्को येथे समाधी वर जर्मन भाषेत लिहिलेले आहे. नान इलूट्रस्ट विक्सिस म्हणजे ईश्वराने मला जे जीवन दिले होते त्याला मी सत्कारणी लावले प्रत्येक व्यक्तीने समाज ऋण चुकवावे हे भारतिय वैदिक तत्वदर्शन पण आहे सर्वानी जीवनात उतरविणे आवश्यक आहे अकोला शहराचे डॉ प्रवीण अग्रवाल व मित्र मंडल डॉक्टर्स ग्रुप द्वारे जेष्ठ होमिओपैथीक डॉक्टरांचे अभिनंदन ,सत्कार , एम डी उत्तीर्ण, सी सी एम पी पास, होमिओपैथी क्षेत्रात विशेष कामगिरी करणारे चिकित्सक सत्कार कार्यक्रम डॉ सॅम्युअल हेनेमान जयंती निमित्त ठेवण्यात आले होते उदघाटन माननीय आमदार श्री रणवीर सावरकर यांनी दीपपूजन व डॉ हेनिमान प्रतिमा पूजन व माल्यार्पण करून केला अयोध्या तीर्थक्षेत्र येथे श्रीरामलला विग्रह प्राणप्रतिष्ठा समारोहात धर्माचार्य रुपात निमंत्रित अकोला गायत्री परिवार चे व 38वर्षांपासून होमिओपैथी चिकित्सा सेवा देणारे डॉ अजय उपाध्याय यांचा सन्मान युवा नेता श्री अनुपजी धोत्रे, प्राचार्य श्री किशोर मालोकार डॉ प्रवीण अग्रवाल, राजा होमियो फार्मेसी संचालक श्री अजय राजा, डॉ सुनिल फोकमारे, डॉ प्रशांत सांगळे यांनी केला जयंती उत्सव सफल बनविण्यासाठी डॉ प्रवीण अग्रवाल, डॉ आदित्य नानोटी, डॉ उज्ज्वल वांगे, डॉ मंगेश तुलस्कर, डॉ दिनेश श्रीवास्तव, डॉ श्रद्धा राजा, डॉ सपना राजपूत, डॉ नरेंद्र श्रीवास डॉ कपील भाटी व होमिओपैथीक डॉक्टर्स ग्रुप यांनी परिश्रम घेतले.
Post Views: 165