अकोला पाटील समाजाच्या अध्यक्षपदी अशोकराव अमानकर तर लोकस्वातंत्र्यचे प्रदीप खाडे सचिव
अकोला पाटील समाजाची कार्यकारिणी घोषीत
विश्वाप्रभात न्यूज ब्युरो
2023-03-06
अकोला : पाटील समाज अकोला ची एक विषेश सभा आज स्थानिक जि.प. कर्मचारी कल्याण भवनात संपन्न झाली. या सभेत समाजाची नुतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. या कार्यकारिणीत माजी उपजिल्हाधिकारी अशोकराव अमानकर यांची सर्वानुमते अध्यक्ष पदावर फेरनिवड करण्यात आली तर सचीव पदावर लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे केन्द्रीय उपाध्यक्ष प्रदीप खाडे यांची निवड करण्यात आली.
कार्यकारिणीत पुढील प्रमाणे इतर पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. कार्याध्यक्ष पदावर सुनील जानोरकर यांची तर उपाध्यक्ष पदावर विनायकराव शेळके व सुरेश गाढे पाटील यांची निवड करण्यात आली. कोषाध्यक्ष पदावर राजेन्द्र मोहोकार यांची तर सहसचीव पदावर विजय बोरकर यांची निवड करण्यात आली. कार्यकारिणीत सदस्य म्हणून डॉ. दिलीप मानकर, वासुदेवराव कडू, अविनाश नाकट, निलेश पवित्रकार, अविनाश पाटील, प्रकाश चतरकर, विक्रम जानोरकर,दिलीपराव काकोडे, संदीप महल्ले, राजदत्त मानकर, शरद पांडे यांची निवड करण्यात आली.
या प्रसंगी अध्यक्ष अशोकराव अमानकर यांनी सदस्य संख्या वाढविण्याचे आवाहन केले तर सचिव प्रदीप खाडे यांनी जिल्ह्य़ातील पाटील समाज म्हणजे एक शक्ती पिठ बनावयास हवे असे आवाहन केले. या सभेत प्रत्त्येक तालुका स्तरावर कार्यकारिणी तयार करणे, विविध समित्या तयार करून त्या मार्फत समाजोपयोगी उपक्रम राबविणे या सह काही ठराव पारीत करण्यात आलेत. सभेत उपरोक्त कार्यकारिणीसह प्रदीप चोरे, दिनकरराव सरप, अशोक पटोकार, रघुनाथराव खडसे, गुणवंतराव जानोरकर, गजानन डिवरे, शाम कुलट, रवि काटे, माणिकराव गावंङे, मधुकरराव महल्ले, शैलेन्द्र काळे, संजय लुंगे, यांचे सह इतरही सदस्य उपस्थित होते. आभार प्रदर्शन कार्याध्यक्ष सुनील जानोरकर यांनी तर प्रास्ताविक सचीव प्रदीप खाडे यांनी केले.
Post Views: 361