मराठा समाज विखुरलेला नको एकत्रीकरण हवे - शरदराव पवार


 विश्वप्रभात  09 Nov 2025, 7:59 PM
   

अकोला - महाराष्ट्रात मराठा समाज मोठ्या संख्येत आहे. हा समाज पाटील, देशमुख, कुणबी, घाटोळे, 96 कुळी, अशा वेगवेगळ्या घटकांमध्ये विखुरलेला आहे. तो एकत्रित असला पाहिजे. त्यांनी एकमेकांना आपल्या नात्यागोत्यात सामावून घेतले पाहिजे. असे विचार भारताचे माजी कृषिमंत्री माननीय शरदचंद्रजी पवार यांनी व्यक्त केले.
                 कान्हेरी सरप येथील वेद नंदिनी ऍग्रो टुरिझममध्ये आज संपन्न झालेल्या व किसान ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष शेतकरी नेते प्रकाश पोहरे यांनी आयोजित केलेल्या  शेतकरी संवाद कार्यक्रमात पाटील समाजाचे सचिव प्रदीप खाडे यांनी विचारलेल्या प्रश्नावर आपले मत व्यक्त करताना ते बोलत होते. सकल मराठा समाजातील पाटील, कुणबी, देशमुख, घाटोळे आदी घटकांच्या एकत्रिकणा बाबत आपले मत काय ? असा तो प्रश्न होता. यावर आपले विचार मांडताना मा. शरदचंद्र पवार म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात 18 पगड जाती होत्या. त्या सर्वांना सोबत घेऊन त्यांनी रयतेचे राज्य निर्माण केले होते. त्यात मराठा समाजही एकत्रितपणे सहभागी होता. माझ्याही नातेसंबंधात मराठा समाजातील सर्वच घटक सहभागी आहेत. समाजाच्या एकत्रीकरणामुळे सर्वच आघाड्यावर त्यांची प्रगती होऊ शकते. असेही मत त्यांनी याप्रसंगी व्यक्त केले. याप्रसंगी शेतकरी नेते प्रकाश पोहरे, माजी गृहमंत्री अनिल देशमुख, शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माजी मंत्री हर्षवर्धन देशमुख, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष  डॉ. संतोष कोरपे, माजी मंत्री खान मोहम्मद अझहर हुसेन, माजी आमदार शरद तसरे, गजाननराव दाळू गुरुजी, लक्ष्मणराव तायडे, ऋषी भाऊ पोहरे,कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शिरीष धोत्रे, महादेवराव भुईभार, संग्राम गावंडे, माजी सभापती राजीव बोचे, भाई प्रदीप देशमुख, किसान ब्रिगेडचे राज्याध्यक्ष पुरुषोत्तम गावंडे, जिल्हाध्यक्ष दिवाकर गावंडे, डॉक्टर सुभाष कोरपे, प्रदीप खाडे, शरद वानखडे, अविनाश पाटील, देवराव हागे पाटील, दिनकर सरप,संदीप महल्ले पाटील व इतरही नेते प्रामुख्याने उपस्थित होते कार्यक्रमाचे संचालन धनंजय मिश्रा यांनी केले.

    Post Views:  37


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व