अंतरंग पब्लिक स्कूलचा वार्षिकोत्सव सिने-मॅजिक - बॉलिवूड संकल्पनेतून साजरा


 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  29 Jan 2025, 8:33 AM
   

अकोला - अंतरंग पब्लिक स्कूलचा वार्षिकोत्सव एक अनोख्या रंगात रंगला. सिने-मॅजिक : बॉलिवूडचं महत्त्व या संकल्पनेखाली साजरा करण्यात आलेल्या या खास समारंभात, विद्यार्थ्यांनी बॉलिवूडच्या चित्रपटांची सजीव आणि रंगतदार झलक दिली. सर्व सादरीकरणे अत्यंत आकर्षक आणि अभूतपूर्व होती, ज्यांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.
आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून पारंपरिक शिक्षण पद्धतीत बदल घडवत शासनाने २०२३ पासून नवीन शैक्षणिक धोरण अंमलात आणले आहे. या धोरणाचा उद्देश विद्यार्थ्यांच्या कौशल्य विकासावर भर देऊन शिक्षणाला अधिक सर्जनशील आणि परिणामकारक बनवणे आहे. शिक्षणाच्या मूलभूत तत्त्वांना जपत आधुनिक दृष्टिकोनाची जोड देण्यात आली आहे. या बदलांना साजेसे संस्थेचे घोषवाक्य, शिक्षणाची परंपरा, उत्कृष्टतेचा वारसा, शिक्षणाचे मूळ उद्दिष्ट अधोरेखित करते. हे धोरण शिक्षण क्षेत्रात नावीन्य आणि विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी महत्त्वाचे ठरेल. असे विचार  समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून बोलतांना मा. आमदार श्री रणधीरभाऊ सावरकर यांनी व्यक्त केले.  
अंतरंग पब्लिक स्कूलच्या या खास संमेलनात सर रतन टाटा यांना विद्यार्थ्यांनी एक शानदार नाटकाद्वारे श्रद्धांजली अर्पण केली. या नाटकात त्यांच्या प्रेरणादायक कार्याचा संजीवनी दस्तावेज दाखवण्यात आला, ज्यामुळे सर्व उपस्थितांच्या मनात आदर आणि प्रेम वाढले.
या समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून श्रीमती रेखादेवी खंडेलवाल राष्ट्रीय अध्यक्ष - विश्वमांगल्य सभा, बाबासाहेब पाठक, श्री सागर शेंगोकार, इंजि. प्रशांत जोशी आणि डॉ. जयश्री जोशी व श्रीमती सोनिया तराळकर उपस्थित होते. या सर्व प्रतिष्ठित व्यक्तींनी आपल्या मार्गदर्शनाने या समारंभाची शोभा वाढवली.
शाळेतील विद्यार्थ्यांना त्यांच्या कार्यासाठी विशेष सन्मान देण्यात आला. वर्ग ५ च्या विद्यार्थिनी मिस. दिव्यानी कनोजिया आणि वर्ग ४ च्या विद्यार्थिनी मिस. सलोनी अपुतकर यांना क्वार्टरली अॅम्बॅसडर म्हणून ट्रॉफी आणि सन्मान प्रदान करण्यात आले. याचबरोबर, वर्ग ५ चा विद्यार्थ्या शीवांक सैनी याला स्टुडंट ऑफ द इयर म्हणून प्रतिष्ठित ट्रॉफी देऊन गौरवण्यात आले. समारंभाची उत्कृष्ट निवेदन आकांक्षा जोशी आणि वर्ग ४ च्या विद्यार्थिनी सलोनी अपुतकर यांनी केले. शाळेतील वार्षिकोत्सव एक भव्य यशस्वी सोहळा ठरला आणि त्यामध्ये विद्यार्थ्यांच्या कलेचे व कौशल्याचे उत्तम प्रदर्शन झाले. शाळेतील शिक्षक व विद्यार्थी मिळून हा समारंभ अपूर्व यश प्राप्त करण्यात सक्षम ठरला. संपूर्ण सोहळा प्रत्येक उपस्थिताच्या हृदयात एक संस्मरणीय ठसा सोडला, ज्याने अंतरंग पब्लिक स्कूलचा वार्षिकोत्सव हा खरोखरच एक ऐतिहासिक घटना ठरवली.

    Post Views:  65


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व