मुंबई : कोरोनाचा नवा प्रकार (Corona New Variant) असलेल्या ओमिक्रॉन (Omicron) विषाणूचा फैलाव आता भारतात वाढताना पाहायला मिळत आहे. मुंबईत आज दोन जणांचा ओमिक्रॉनची लागण झाल्याचं समोर आलंय. राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने (National Institute of Virology) दिलेल्या अहवालानुसार, आज मुंबईत ओमिक्रॉन विषाणूचा संसर्ग झाल्याचे सिध्द झाले आहे. यामुळे महाराष्ट्रातील ओमिक्रॉन विषाणू आढळलेल्या रुग्णांची संख्या आता 10 वर पोहोचली आहे.
दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्गवरुन 25 नोव्हेंबर 2021 रोजी मुंबईत आलेल्या 37 वर्षीय पुरुषाला ओमिक्रॉन विषाणूची बाधा झाल्याचे सिध्द झाले आहे. या रुग्णासोबत राहिलेल्या आणि 25 नोव्हेंबरला अमेरिकेहून आलेल्या त्याच्या 36 वर्षीय मैत्रिणीला देखील या विषाणूची बाधा झाल्याचे प्रयोगशाळा अहवालातून समोर आले आहे. दरम्यान, या दोघांना कोणतीही लक्षणे नाहीत. हे दोन्ही रुग्ण सेव्हन हिल्स रुग्णालयात भरती आहेत. या दोन्ही रुग्णांनी फायझर लसीचे दोन्ही डोस घेतलेले आहेत. या दोन्ही रुग्णांच्या 5 अतिजोखमीच्या आणि 15 कमी जोखमीच्या निकट सहवासितांचा शोध घेण्यात आलेला आहे. पुढील तपास सुरु आहे, अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.
Post Views: 229
सर्व
सर्व
admin@sanjay
admin@Sanjay