राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी किसान सभा च्या प्रदेश सरचिटणीस पदी शेगाव येथील अरुण भटकर यांची नियुक्ती


 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  04 Nov 2025, 10:10 AM
   

शेगांव - राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी किसान सभा च्या प्रदेश सरचिटणीस पदी शेगाव येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे जुने आणि प्रामाणिक कार्यकर्ते अरुण भाऊ भटकर यांची नियुक्ती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी किसान सभा चे प्रदेशाध्यक्ष वसंतराव मनकर यांनी 29 ऑक्टोंबर ला दिलेल्या नियुक्ती पत्रानुसार करण्यात आलेली आहे. शेगाव येथील अरुण भाऊ भटकर हे जुने आणि पक्षाची एकनिष्ठ कार्यकर्ता असून ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मध्ये नेहमीच सक्रिय स्वरूपात आपली भूमिका बजावीत असतात आणि म्हणूनच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील जी तटकरे यांनी अरुण भाऊ भटकर यांच्या कार्याची दखल घेत त्यांची नियुक्ती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी किसान सभा च्या सरचिटणीस पदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यांची ही नियुक्ती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी किसान सभाचे प्रदेशाध्यक्ष ऍडव्होकेट वसंतराव मनकर यानी २९ ऑक्टोबर रोजी त्यांना दिलेल्या नियुक्ती पत्रानुसार केलेली आहे. अरुण भाऊ भटकर यांची नियुक्ती झाल्याने शेगावला त्यांच्या समर्थक का कडून आनंद व्यक्त करण्यात येत आहे. त्याच्या या नियुतीने त्याचे सर्व स्तरातून अभिनंदनाचा वषांत होत आहे.

    Post Views:  64


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व