तांदळीतील पाणी लाभधारक शेतकऱ्यांची सभा


 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  25 Jan 2025, 2:02 PM
   

जिल्हा प्रतिनिधी: वैभव हराळ  
श्रीगोंदा - तांदळी दुमाला ग्रामपंचायतमधील आयोजित सभेमध्ये मायनर चारी नंबर ६२व मायनर चारी नंबर ६३ वरील काही लाभदायक शेतकरी यांच्याबरोबर हेड टू टेल पर्यंत पाणी पोहोचण्याची गरजेवर चर्चा करण्यित आली. या सभेला तांदळी गावचे सरपंच संजय निगडे व संजय शेळके यांनी तांदळी दुमाला मधील शेतकऱ्यांची समस्या सोडवण्यासाठी या मिटींगला श्रीगोंदा कुकडी कॅनॉलचे सी.ओ बोरुडे यांना निमंत्रित केले होते. तांदळी दुमाला येथे आयोजित करण्यात आलेल्या मीटिंग मध्ये बोरुडे यांची प्रमुख उपस्थिती होती. गावाची हरित क्रांती कशी घडून येईल व शेतकरी कष्टकरी कसा सुखी होईल,पाणी हेच जीवन आहे पाण्याविना शेती होऊ शकत नाही, म्हणून बोरुडे यांनी  आम्हालख सहकार्य करावे अशी विनंती यावेळी करण्यात आली‌. याप्रसंगी माजी उपसरपंच महेश भोस,अजिनाथ धावडे,उपसरपंच तुषार धावडे , पै काशिनाथ हराळ, सोसायटी सदस्य नाना दंगडे, लाभदायक शेतकरी उपस्थित होते. यामध्ये या दोन्ही चाऱ्यांची थकबाकी ५४ हजार रुपये भरून चारी दुरुस्त करून पुढील येणाऱ्या पाण्याचे नियोजन करण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली . लवकरच तांदळी दुमाला मध्ये पाण्याबरोबर रस्ता देखील दुरुस्त करण्यात येईल, असे आश्वासन कुकडी पाटबंधारे सी ओ बोरुडे यांनी यावेळी दिले.

    Post Views:  553


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व