दिव्यांग सोशल फाउंडेशनच्या मंचावर संगीतकार कौशल इनामदार व अभिनेत्री इरावती लागू २८ मे रोजी अकोल्यात


 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  28 May 2023, 10:15 AM
   


अकोला: स्थानिक दिव्यांग सोशल फाउंडेशन रविवार २८ मे २०२३ रोजी आर.एल.टि. विज्ञान महाविद्यालय अकोला येथे संगीतकार कौशल इनामदार व अभिनेत्री इरावती लागू यांच्या उपस्थितीत स्वर काव्य महोत्सवाचे आयोजन करीत आहे.  दिनांक २७मे २०२३ रोजी वृंदावन गार्डन, अकोला येथे झालेल्या पत्रकार परिषदेत अभिनेत्री इरावती लागू, संस्थापक अध्यक्ष प्रा.विशाल कोरडे,अनामिका देशपांडे ,भारती शेंडे,जया देशमुख,ब्रिजमोहन चितलांगे,ओंकार गांगर्डे, डॉ.संजय तिडके व विजय कोरडे  यांच्या उपस्थितीत दिव्यांगांच्या शिक्षण रोजगार व आरोग्यासाठी समर्पित स्वर काव्य महोत्सव बाबत माहिती देण्यात आली. स्वर काव्य महोत्सवात दिव्यांगांना व्हिलचेअर, व्हाईटकेन, ब्रेल बुक्स व शिष्यवृत्ती चे वाटप,दिव्यांग लिखित कविता संग्रहाचे प्रकाशन, कौशल इनामदार यांची संगीत मैफिल, अभिनेत्री इरावती लागू यांचा रसिकांशी संवाद, संपूर्ण भारतातून आलेल्या दिव्यांग कवींची काव्य प्रस्तुती व दिव्यांगांसाठी कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सत्कार सोहळा आयोजित केला आहे. 

    Post Views:  174


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व