प्रभातचे पाच बॉक्सर राज्यस्तरावर


विभागस्तरीय स्पर्धेत प्रभातच्या मुष्टीपटूंनी पटकाविले सुवर्ण पदक
 विश्वप्रभात न्यूज ब्युरो  2022-12-12
   

अकोला : प्रभात किड्स स्कूलच्या मुष्टीपटूंनी अमरावती विभागस्तरीय शालेय बॉक्सिंग स्पर्धेमध्ये उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करुन विविध वजन वयोगटात  चार सुवर्ण पदक प्राप्त केले असून पाच मुष्टिपटूंची निवड राज्यस्तरीय शालेय बॉक्सिंग स्पर्धेसाठी झाली आहे.  
      अमरावती विभागस्तरीय स्पर्धेचे आयोजन स्थानिक वंसत देसाई क्रीडा संकुलात दि. ८ ते १० डिसेंबर दरम्यान करण्यात आले होते. स्पर्धेच्या प्रथम दिवशी १४ वर्षाखालील वयोगटाची स्पर्धा संपन्न झाली. या स्पर्धेत निखिलेश धबाले याने ४६-४८ किलो वजन गटात तर शाश्वत महल्ले याने ४८-५० किलो वजन गटात सुवर्ण पदक प्राप्त केले.  १७ वर्षाखालील वयोगटात गार्गी राऊत हिने सुवर्ण पदक प्राप्त करून राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पात्र झाली आहे. त्याचप्रमाणे या वयोगटात प्रभातची राष्ट्रीय खेळाडू पलक झामरे हिची देखील निवड झाली आहे. १९ वर्षाखालील वयोगटात ओम वानखेडे याने सुवर्ण पदक प्राप्त करून आपली राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड निश्चित केली आहे. पाचही विजयी मुष्टिपटूंना प्रभातचे बॉक्सिंग प्रशिक्षक राहुल वानखडे आणि रिया ताराम यांचे मार्गदर्शन लाभले. प्रभातच्या प्राचार्य वृषाली वाघमारे, उपप्राचार्य अर्चना बेलसरे, समन्वयक मो. आसिफ, क्रीडा विभाग प्रमुख संतोष लोमटे यांच्यासह शिक्षक तथा शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी विजयी खेळाडूंचे कौतुक केले असून आगामी स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

    Post Views:  161


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व