(श्री. संतोष घरत ) -पालघर - दहावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांनीला निकालाच्या आधीच तिच्यावर अत्याचार करून दगडाने ठेचून हत्या केल्याची धक्कादायक घटना पालघर मधील जव्हार येथील समोर आली आहे . जव्हार तालुक्यातील वडपाडा येथील ही हृदय हेलावणारी घटना असून मागील काही दिवसांपासून दहावीची परीक्षा दिलेली विद्यार्थिनी बेपत्ता होती . या बेपत्ता तरुणीचा मृतदेह काल जव्हारमधील तांबडपाडा येथे आढळून आला असून तिच्यावर अत्याचार करून दगडाने ठेचून तिची निर्घृण हत्या करण्यात आली आहे . तसंच तिच्यावर बलात्कार झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलीस प्रशासनाकडून व्यक्त करण्यात येत असून शवविच्छेदनाचा अहवाल अजूनही प्रतीक्षेत आहे . पीडित विद्यार्थिनी ही मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असून दहावीच्या निकालात ती 67% गुण मिळवत पास झाली . मात्र निकाल बघण्याआधीच तिची निर्घृण हत्या करण्यात आली . या घटनेबाबत भादवि कलम 302 , 301 , 341 नुसार जव्हार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतल आहे . तसंच पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
Post Views: 446
सर्व
सर्व
admin@sanjay
admin@Sanjay