ग्राम निंबा येथे बुद्ध पौर्णिमा उत्साहात साजरी


 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  18 May 2022, 9:03 AM
   

निंबा : बुद्ध पौर्णिमा अर्थात भगवान गौतम बुद्ध यांची जयंती बुधवारी बाळापूर तालुक्यातील ग्राम निंबा  येथे  बौद्ध पौर्णिमा आनंदात साजरी करण्यात आली. बुद्ध जयंती निमित्त तथागत भगवान गौतम बुद्ध यांना वंदन करण्यासाठी गावातील बौद्ध अनुयायांची गर्दी उसळली होती. जगाला शांती अहिंसा व मैत्री चे संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त ग्राम निंबा येथे खीर वाटप चे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. बौद्ध विहारांमध्ये संध्याकाळी सामूहिक बुद्ध वंदना त्रिशरण व पंचशील ग्रहण करून भगवान बुद्ध यांना वंदन करण्यात आले. तसेच कार्यक्रम मधून तथागत बुद्ध यांचे जीवन कार्यावर प्रकाश टाकण्यात आले. बुद्ध जयंती निमित्त सकाळपासूनच निंबा गावात बौद्ध उपासक-उपासिका त्यांची गर्दी  झाली होती. त्यामुळे निंबा परिसर नागरिकांच्या गर्दीमध्ये फुलला होता. बौद्ध पौर्णिमा निमित्त खीर वाटप  करण्यात आले होते सर्व आयोजन बौद्ध बांधव यांनी केले होते.

    Post Views:  275


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व