सुजात शिरसाट निटमध्ये ५५२ गुण प्राप्त करून डॉक्टर होत असल्याबद्दल अभिनंदन!
विश्वाप्रभात न्यूज ब्युरो
18 Jul 2026, 10:28 AM
अकोला - ग्रामीण भागातून आंबेडकर चळवळीसाठी झटणारे एकनाथरावजी शिरसाट यांचा नातू तसेच ग्रंथालय अधिकारी असलेले आयु. अजय एकनाथ शिरसाट व आयु. रंजना अजय शिरसाट यांचा चिरंजीव सुजात शिरसाट याने राष्ट्रीय परीक्षा एजंसीमध्ये ५५२ गुण प्राप्त करून डॉक्टर होण्यास पात्र झाल्याबद्दल त्याचे व त्याच्या परिवाराचे मन:पूर्वक अभिनंदन !
सुजात अजय शिरसाट हा डॉक्टर होण्यास सज्ज झाल्याने आपल्या न्यु महसुल कॉलनीचे नाव त्याने समाजामध्ये रोशन केले आहे. सुजातची जिद्द, चिकाटी, एकाग्रता व जास्तीत जास्त अभ्यासात राहल्याने त्याने हे भरभरून यश प्राप्त केलेले आहे. आपल्या कॉलनीचे नाव तर त्याने उज्वल केलेच आहे ! परंतू त्याचे सामाजिक कार्यात असलेले आजोबा एकनाथजी शिरसाट, ग्रंथालय अधिकारी असलेले अजय शिरसाट आदर्श गृहीणी असणार्या रंजना शिरसाट या सर्वांचा ऊर अभिमानाने भरून यावा असे नेत्रदिपक कार्य सुजातने करून दाखविले आहे. त्यामुळे सुजात सोबतच त्याचे आजोबा, त्याचे आईबाबांचे अभिनंदन करावे तेवढे कमीच आहे.
आपल्या मुलाबाळांनी अशा मोक्याच्या जागा हस्तगत करण्यासाठी श्रमाची पराकाष्ठा केली पाहिजे. स्वत:ला अभ्यासामध्ये झोकून दिले पाहिजे. तसे सुजातने स्वत:ला झोकून दिल्याने त्याने हे यश संपादन केले आहे. विनाकारण तो कुठेच दिसला नाही, आपला वेळ वाया जाईल असे कोणतेही काम त्यांनी केलेले नाही. त्याने एजंडा सेट केलेला होता की आपल्याला डॉक्टर बनायचे ते त्याने करून दाखविले. ही जिद्द, अशी चिकाटी अशी लगन विद्यार्थ्यांनी असू द्यावे यश तुम्हाला हमखास मिळणार आहे. आपल्या विद्यार्थ्यांनी सुजातचा आदर्श घ्यावा अशा गुणवान विद्यार्थ्याचे हार्दिक हार्दिक अभिनंदन !
मित्रांनो, मागच्या महिन्यामध्ये आमच्या मॉ जिजाऊ सार्वजनिक वाचनालयातर्पेâ परिसरातील गुणवान विद्यार्थ्यांच्या सत्काराचे आयोजन केले होते. त्यासाठी मी त्याला सत्कारासाठी आवर्जून त्याचे आई-बाबाला फोन केला होता. परंतू थोड्याश्या यशाने हुरळून जाणारा सुजात नव्हता! त्याने त्याचे आई-बाबाला सांगीतले की, माझा अभ्यासाचा वेळ असल्याने मी सत्काराला येवू शकणार नाही, असे त्याने उत्तर दिल्याचे त्याचे वडीलाने मला सांगीतले. परंतू मी त्यांना विनंती करून त्याने सत्कार स्वीकारावा अशी विनंती केली असता ‘‘मी सत्कार झाल्याबरोबर निघून येईल’’ या अटीवर तो येण्यास तयार झाला. त्याच्या लाडक्या आजोबासोबत सुजात आला. आम्ही बोलाविलेल्या मान्यवरांमध्ये प्रा.डॉ. बाळकृष्ण खंडारे लिखीत ‘शिक्षणाविषयी बोलू काही'पुस्तकाच्या प्रकाशनाकरीता आलेले मान्यवर उपशिक्षणाधिकारी सुभाष भालेराव साहेब, सम्राट अशोक प्रतिष्ठानचे जिल्हाध्यक्ष प्रा. विजय आठवले सर प्राचार्य प्रा.डॉ. संतोष पेठे सर, सचिव प्रा. सुनिल कांबळे सर, प्राचार्य रत्नदीप थोरात सर, बबलू तायडे सर, से.नि. तहसीलदार आत्माराम तेलगोट, वासुदेवराव चक्रनारायण, रामकुमार खंडारे गुरुजी, ओरा चक्रे सर प्रकाशिका सुनंदा पंजाबराव वर, पडघाोल सर, दिनेश सोनोने, सुजाता बाळकृष्ण खंडारे,मिनाक्षी शेगोकार, मनिषा भुजाडे, विद्या अंभोरे, मेघा प्रतिकराव भगत/वर (नर्सिंग अधिकारी, एम्स, नागपूर) ओरा चक्रे सर, विद्याधर मोहोड, रत्नाकर भुजाडे, जयश्री झिने आदींच्या उपस्थितीत सुजातचा त्याचे आजोबासह सत्कार केला.
आम्ही एका गुणवान भावी डाक्टराचा सत्कार केल्याबद्दल मनोमन आनंद होतो आहे व अभिमान सुद्धा वाटतो आहे. सुजातने उत्कृष्ठ डॉक्टर होऊन आपले नाव समाजात रोशन करावे व त्याचे हातून समाज बांधवांची सेवा घडावी अशीच तथागत चरणी मंगलकामना करतो व त्याला भावी जीवनासाठी मंगलमय मंगलमय शुभेच्छा व्यक्त करतो !!!
Post Views: 24