दिव्यांग सोशल फाउंडेशनच्या दिवाळी किटचे उद्घाटन संपन्न
विश्वाप्रभात न्यूज ब्युरो
06 Oct 2025, 1:14 PM
अकोला : स्थानिकदिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला च्या माध्यमाने डॉ.विशाल कोरडे यांच्या मार्गदर्शनात दिव्यांग बांधवांनी दिवाळीसाठी पूजा किट निर्माण केली असून सदर किट मध्ये दिवाळीच्या पूजेचे साहित्य एकाच ठिकाणी उपलब्ध करण्यात आले आहे. ४ ऑक्टोबर २०२५ रोजी जिल्हा परिषद कर्मचारी भवन येथे देशमुख महिला मंडळाच्या हस्ते सदर दिवाळी पूजा कीटचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला . यावेळी मंचावर दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला चे डॉ.विशाल कोरडे , देशमुख महिला मंडळाचे राजश्री देशमुख , मालती कायते , अर्चना गाडवे व संगीता देशमुख उपस्थित होते. सदर दिवाळी पूजा किट मध्ये अगरबत्ती, धूपबत्ती, वाती, फुलवाती ,अत्तर ,कापूर ,सुगंधी उटणे व मेणाचे दिवे एकाच आकर्षक कागदी बॅग मध्ये उपलब्ध आहे. एक हात सहकार्याचा या सामाजिक उपक्रमातून मिळालेली देणगी दिव्यांग बांधवांना समर्पित असून या देणगीतून व्हीलचेअर ,व्हाईट केन, ब्रेल बुक्स, कर्णयंत्र व शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती संस्थापक अध्यक्ष डॉ.विशाल कोरडे यांनी दिली. राजश्री देशमुख यांनी या सदर उपक्रमाला शुभेच्छा देऊन समाजातील सर्व महिला मंडळ, सामाजिक संस्था ,शाळा, महाविद्यालय येथील व्यक्तींनी ही दिवाळी पूजा किट खरेदी करून दिव्यांगांना सहकार्य करावे असे आवाहन केले.ज्या दिव्यांग बांधवांना सदर सामाजिक उपक्रमात सहभाग नोंदवायचा आहे त्यांनी संस्थेच्या ९४२३६५००९० या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधावा अशी माहिती तन्वी दळवे यांनी दिली.या सामाजिक उपक्रमात डॉ बाबासाहेब आंबेडकर कॉलेज ऑफ जर्नालिजम अँड सोशल वर्क चे अभिषेक डोंगरे ,प्रणव इंगळे ,स्नेहल खडसे, अंजली जामनिक , सांची तायडे हे विद्यार्थी स्वयंसेवक म्हणून कार्य करीत आहेत. अकोल्यातील विविध सामाजिक संस्था त्याचबरोबर महाराष्ट्रातील विविध मान्यवर या उपक्रमाला भेट देऊन सहकार्य करीत आहेत.
Post Views: 77