पुनीत सागर अभियान मोहिमेअंतर्गत एन.सी.सी. कॅडेट्सनी केले पटनाट्याचे सादरीकरण


 विश्वप्रभात न्यूज ब्युरो  04 Feb 2023, 6:38 PM
   

दि. बेरार जनरल एज्युकेशन सोसायटी द्वारा संचालित श्रीमती एल. आर. टी. वाणिज्य महाविद्यालयाच्या एन. सी. सी.  कॅडेट्सनी पुनीत सागर या अभियाना अंतर्गत लोकांमध्ये जनजागृती आणि मार्गदर्शनासाठी पथनाट्याचे आयोजन केले.  समुद्र किनारे, नद्या, तलाव व इतर जलस्रोत स्वच्छ करण्यासाठी एन.सी. सी. द्वारे पुनीत सागर अभियान सुरू करण्यात आले. पाण्याचे स्त्रोत स्वच्छ ठेवण्याच्या महत्त्वाबद्दल स्थानिक लोकांमध्ये जागरूकता वाढवण्याचा या मोहिमेचा प्रयत्न आहे. ११ महाराष्ट्र बटालियनचे कमांडिंग ऑफिसर कर्नल बिजॉय चौधरी व लेफ्टनंट कर्नल चंद्रप्रकाश भदोला यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच श्रीमती. एल. आर. टी. कॉलेजचे प्राचार्य डॉ. एस. जी. चापके व महाविद्यालयाचे एन. सी. सी. ऑफिसर कॅप्टन डॉ. अनिल तिरकर यांच्या नेतृत्वाखाली या पथनाट्याचे आयोजन करण्यात आले. या पथनाट्याद्वारे एन.सी.सी. कॅडेट्सनी समुद्र किनारे, नदी किनारे इतर पाण्याचे स्त्रोत स्वच्छ ठेवण्याच्या महत्त्वाबद्दल स्थानिक लोकांमध्ये  जागरूकता वाढवण्याचा प्रयत्न केला. प्लास्टिक प्रदूषण रहित पर्यावरणाशी संबंधित वेगवेगळ्या मुद्यांवर कॅडेट्सनी प्रकाश टाकला. महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.जी.जी. गोंडाने यांनी कॅडेटला स्वच्छतेचे महत्व सांगुन लोकांमध्ये जागरूकता वाढवण्याचा प्रयत्न केला. आय. क्यू.ए.सी. समन्वयक डॉ. योगेश अग्रवाल यांनी महत्त्वाचे पाण्याचे स्त्रोत साफ करण्यासाठी एक राष्ट्रव्यापी प्रमुख अभियान, पुनीत सागर अभियान मध्ये सहभाग होण्याकरिता कॅडेटला आवाहन केले. या पथनाट्यामध्ये सी. पी. एल. शिवानी अवातीरक, कॅडेट नितिक्षा पांडे, कॅडेट हर्षा गायकवाड़, कॅडेट स्नेहल गायकवाड़, कॅडेट सिमरन इंगले, कॅडेट भूमि काशिद, कॅडेट साक्षी झटाले, कॅडेट उर्मिला बुंदेले, कॅडेट धनश्री दाने, कॅडेट धनश्री चव्हाण, कॅडेटआर्या गंगाखेडकर, कॅडेट लक्ष्मी सुले, कॅडेट कल्याणी आमले सहभागी होते. तसेच या पथनाट्य कार्यक्रमाचे आयोजन व यशस्वीतेसाठी सीनियर अंडर ऑफिसर रोहित डिगे, जूनियर अंडर ऑफिसर मिनल रेड्डी, जूनियर अंडर ऑफिसर श्याम ढोरे, सार्जंट जयश्री हरसुलकर, सार्जंट ऋषिकेश पटेल, कॉर्पोरल ओम डांगे, कॉर्पोरल प्राजक्ता नारखेडे, कॉर्पोरल वैष्णवी ढेंमरे, कॉर्पोरल कार्तिक लाडगे, कॉर्पोरल सागर वानखडे कॅडेट शिवम देशमुख, कॅडेट रेशमा गालफाडे, कॅडेट वैष्णवी पांडे, कॅडेट साक्षी पांडे, कॅडेट तनाया नाफाडे, कॅडेट किरण माने, कॅडेट पुर्वा देवघरे, कॅडेट साक्षी गुप्ता, कॅडेट गीता गावंडे, कॅडेट साक्षी ठाकरे, कॅडेट सलोनी यादव, कॅडेट श्रीकांत वाडोकार, कॅडेट जय नांदोडे, कॅडेट सुरज सरकटे, कॅडेट नागेश कचरे‌, कॅडेट रितिक आगरकर, कॅडेट ॠषिकेश शेलार, कॅडेट प्रथमेश तळेकार, कॅडेट प्रणव वानखडे, कॅडेट वैभव कांबळे, कॅडेट रोशन इंगोले, कॅडेट कार्तिक लाडगे, कॅडेट सर्वेश धांडे आणि इतर कॅडेट्सनी बरीच मेहनत घेतली. या पथनाट्याचे सादरीकरण  करतांना महाविद्यालयातील सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, महाविद्यालयीन विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Connection failed: Operation not permitted