फुले, शाहू, आंबेडकरांच्या तत्वद्यानातूनच बहूजन नेतृत्व तयार होऊ शकते - संजय एम. देशमुख
संस्थापक- राष्ट्रीय अध्यक्ष संजय देशमुख व उपाध्यक्ष प्रदिप खाडे यांचा अमरावती पदाधिकाऱ्यांच्या हस्ते
विश्वाप्रभात न्यूज ब्युरो
12 Jul 2025, 2:31 PM
लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ जिल्हा कार्यकारिणीच्या परिसंवाद
आसेगाव पूर्णा (प्रतिनिधी )-- आज समाजात योग्य नेर्तृत्वाच्या अभावामुळे सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक, राजकीय क्षेत्रातील ज्वलंत समस्या मोठ्या प्रमाणात वाढलेल्या आहेत. समूह शक्तीचे महत्व लक्षात न घेतल्याने समाज दिशाहिन होत चालला आहे. संघटना मजबूत दिसून येत नाहीत.त्यामुळे सरकारवर उचित दबाव पडत नसल्याने संविधान विरोधी मनमानी कारभाराने लोकशाही धोक्यात आलेली आहे. त्यासाठी शाहू,फुले आंबेडकरांना अभिप्रेत असलेले कार्यकर्ते निर्माण होणे ही काळाची गरज आहे. संघटन मजबूत करून समाजातील विषमता दूर करण्यासाठी शासनाला बाध्य करण्यासाठी समाजातील युवाशक्तीने पुढाकार घेतला पाहिजे. बुद्धिजीवी वर्गाने फुले, शाहू, आंबेडकर यांच्या तत्वद्यानातून वैचारीक परिवर्तनाव्दारे विकास घडवून आणला पाहिजे. शाहू,फुले,आंबेडकरांच्या सामाजिक विचारांनीच अनाचाराविरूध्द संघर्ष करणारी युवा नेर्तृत्वं तयार होऊ शकतात असे प्रतिपादन लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ या समाजाभिमुख राष्ट्रीय संघटनेचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष संजय एम देशमुख यांनी केले.
राजमाता जिजाऊ बहुउद्देशीय संस्था, पूर्णांनगर व लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ, शाखा अमरावती यांच्या संयुक्त विद्यामाने पोहरा पूर्णा (आसेगाव पूर्णा ) येथे आयोजित संजय सरवटकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजित परिसंवादामध्ये ते बोलत होते.
लेडी गव्हर्नर डॉ. कमलताई गवई, ह्या कार्यक्रमाच्या उद्घाटक तर भदन्त बुध्दघोष महाथेरो अध्यक्षस्थानी होते. प्रमुख अतिथी म्हणून लोकस्वातंत्र्य उपाध्यक्ष प्रदीप खाडे, राष्ट्रीय पदाधिकारी पुष्पराज गावंडे, केन्द्रीय सचिव राजेन्द्र देशमुख उपस्थित होते. अमरावती जिल्हाध्यक्ष संजय बि. देशमुख, अख्तर काजी, राहुल वाकपैंजण (उद्योजक ), ऍड. दीपक सरदार, यांची यावेळी विचारमंचावर प्रमुख उपस्थिती होती.
सर्वप्रथम मान्यवरांनी म. फुले शाहू महाराज, छ. शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन केले. संजय सरवटकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांचे हस्ते केक कापण्यात आला. नंतर परिसंवाला सुरुवात करण्यात आली. अनेकानी यात "फुले, शाहू, आंबेडकर यांना अपेक्षित कार्यकर्ता" या विषयावर आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संजय सरवटकर, संचालन वाय. एम. रामटेके तर आभारप्रदर्शन भारत वरठे यांनी केले, कार्यक्रमाला लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ चांदुर बाजार शाखा, धामणगाव रेल्वे, अचलपूर तसेच जिल्यातून अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
Post Views: 74