सामाजिक कार्यकर्ता एन.टी. गोपनारायण यांचा सुपुत्र मृगसेनची पी.एच.डी. रिसर्चकरिता जर्मनीला निवड


 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  06 Feb 2023, 9:25 AM
   

अकोला : ़गोरेगांव बु. ता. जि. अकोला लहानशा खेड्यातील रहीवासी तसेच आर्थिक परिस्थिती अतिशय खालावलेली असतांना बुद्धीमत्तेच्या जोरावर विद्यार्थी कुठपर्यंत झेप घेऊ शकतो याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे एन.टी. गोपनारायण यांचा सुपुत्र मृगसेन एन. गोपनारायण होय.  दहावीपर्यंत नोएल इंग्लीश हायस्कूल अकोला येथे शिक्षण ज्युनिअर कॉलेजमध्ये प्रवेश घेतल्यानंतर डॉ. ए.पी.जे. अब्दूल कलाम सरांनी (शास्त्रज्ञ) जी परिक्षा कीशोर वैधानिक प्रोत्साहन योजना ती परिक्षा भारतातून ५ लाख विद्यार्थ्यांमधून तिसर्‍या क्रमांकाने उत्तीर्ण होऊन बेंगलोर (कर्नाटक) येथील इंडीयन इंन्स्टीट्युट ऑफ सायन्स रिसर्च कॉलेज यशवंतपूरम कॉलेजमध्ये एम.एस. रिसर्च पदवी प्राप्त करून आय.आय.टी. कॉलेज कानपूर (उत्तरप्रदेश) येथे प्रोजेक्टसाठी पाठविल्या जातो.  तीथून पी.एच.डी. रिसर्च, विदेशात भारतातून २० विद्यार्थी निवडल्या गेलेत. त्यामध्ये ‘मृगसेन’ चा नंबर लागतो. निवडल्या जातो. ही अतिशय अभिमानास्पद, गौरवास्पद, कौतूकास्पद बाब असून जर्मनी सारख्या बुद्धीमत्तेने परीपूर्ण असलेल्या ‘एम्बर्ग युनिवरसिटी’मध्ये संशोधनासाठी जात आहे. त्यामुळे समाजामध्ये, कुटूंबामध्ये, मित्र परिवार, आप्तेष्ठामध्ये आनंदाचे, उत्साहाचे वातावरण तयार होत आहे. मृगसेनचे सर्वच स्तरातून कौतूक, सन्मान होत आहे.
मृगसेन हा एक आंतरराष्ट्रीय किर्तीचा संशोधक व्हावा अशी कुटूंबाची, मातापित्याची, बहीणीची जिल्ह्याची,देशाची मान उंचावेल अशा शास्त्रज्ञ व्हावा ही आशा माता श्रद्धा पिता एन.टी. गोपनारायण यांनी व्यक्त केले. अकोला येथील सुप्रसिद्ध प्राध्यापक नितीन ओक सर यांचे मार्गदर्शन, नोएल स्कूलचे सर, मॅडम, बहीण डॉ. यश्मी गोपनारायण, आई प्रा. श्रद्धा गोपनारायण यांना मार्गदर्शनाचे श्रेय देतो. मृगसेनची उत्तरोत्तर प्रगती व्हावी व आधारस्तंभ बनावा असे मत एन.टी. गोपनारायण यांनी पत्रकाद्वारे व्यक्त  केले.

    Post Views:  542


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व