कस्तुरी ची त्रिदिवसीय व्याख्यानमाला दि. ३१ ऑक्टोबर पासून....


 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  27 Oct 2026, 8:17 AM
   

अकोला : महानगरातील सामाजिक, सांस्कृतिक व बौद्धिक प्रबोधनाचा वसा निरंतर ठेवण्यासाठी  शहरातील अग्रणी सेवाभावी संस्था कस्तुरी चॅरिटेबल सोसायटी आणि आपातापा येथील वै. सुनंदाताई शांताराम बुटे वारकरी शिक्षण विदयालयाच्या संयुक्त विद्यमाने अकोल्यात शनिवार दि.३१ ऑक्टोबर ते सोमवार दि.२ नोव्हेंबर दरम्यान ' त्रिदिवसीय कस्तुरी व्याख्यानमाला'  चे  आयोजन करण्यात आले असून  या व्याख्यानमालेचा प्रारंभ  शनिवार दि. ३१ ऑक्टोबर रोजी होणार आहे..
... कस्तुरी व्याख्यानमालेचे हे १४  वे वर्ष असून या व्याख्यानमालेत आजपर्यंत महाराष्ट्रातील अनेक नामवंत  वक्त्यांनी व्याख्याने देऊन अकोलेकरांचे विविध सामाजिक विषयांवर उदबोधन केले आहे.....
स्थानिक प्रमिलाताई लोक सभागृह अकोला येथे दररोज संध्याकाळी ६  वाजताआयोजित करण्यात आलेल्या या व्याख्यानमालेत दि. ३१ ऑक्टोबर रोजी नागपुर  येथिल सुप्रसिद्ध वक्ते श्रीपाद कोठे  ' स्वामी विवेकानंद आणि भारत' या विषयावर प्रथम पुष्प गुंफणार  असून  या सत्राच्या अध्यक्षस्थानी  निवृत्त पोलिस अधिकारी ह.भ.प.श्री देविदास निखारे राहणार आहेत..
दि. १ नोव्हेंबर रोजी पुणे येथील संत सेवा संघाचे अनुयायी व ख्यातनाम वक्ते मा. विजय खुटवड हे ' छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा सांगणारी GEN Z ' या विषयावर द्वितीय पुष्प गुंफणार असून या सत्राचे अध्यक्षस्थानी कस्तुरी स्नेही व जेष्ठ नागरिक संघ सहसचिव मा. श्री. प्रमोद देशमुख असतील...
... त्याचप्रमाणे दि.२ नोव्हेंबर रोजी ' काव्य आणि मानसशास्त्रातून सहजीवनातील समस्यांची उकल करणारा एक आगळा वेगळा प्रबोधनात्मक कार्यक्रम ' मनाचिये द्वारी ' आयोजित करण्यात आला असून नागपूर येथील मिलिंद देशपांडे व मिलिंद आपटे आणि स्थानिक सौ.ऋजुता रानडे हे सादरीकरण करणार आहेत हा कार्यक्रम कस्तुरी स्नेही व निवृत्त प्राध्यापक प्रभाकर पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होईल.
... व्याख्यानमालेच्या  यशस्वी आयोजनासाठी एक समिती गठीत करण्यात आली असून यात सर्वश्री संजय ठाकरे  , श्री, संजय गायकवाड, राजेश्वर पेठकर, अनिल पालवे ,  नितीन अंधारे , घनश्याम चांडक , दीपक झाडे,अतुल कुळकर्णी , संजय बुटोले , दामोदर नुपे , अनिता इधोळ , संगीता जोध , सौ. मीरा देशपांडे, सौ. करुणा बुटे, चेतना आनंदानी , सौ . अपर्णा काळे  , श्रीमती ज्योती सुलताने  इ. चा समावेशआहे.....
... अकोला शहरातील  कस्तुरी प्रेमी व रसिकांनी व्याख्यानमालेला उपस्थिती देऊन व्याख्यानमाला यशस्वी करावी असे आवाहन 'कर्मयोग ' शिक्षण प्रसारक मंडळ, आपातापा चे अध्यक्ष  डॉ. शांताराम बुटे आणि 'कस्तुरी' या सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. किशोर बुटोले यांनी केले आहे... 

    Post Views:  3


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व