श्रावस्ती नगर येथे बुद्ध आणि त्यांचा धम्म ग्रंथ समाप्ती उत्साहात


 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  06 Oct 2025, 1:11 PM
   

अकोला : खडकी विभागातील श्रावस्ती नगर येथे गेल्या तीन महिन्यांपासून विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखीत बुद्ध आणि त्यांचा धम्म या समाजाचे भले करणार्‍या पवित्र ग्रंथाचे वाचन येथील आदर्श शिक्षीका सविता विनोद भगत यांनी केले. श्रावस्ती नगरातील समस्त उपासक व उपाशिका यांनी यामध्ये सहभाग नोंदविला होता. रविवार दि. ५ ऑक्टोबर २०२५ रोजी पुज्य भंते धम्मानंद यांचे पावन अमृत वाणीचे ग्रंथाची सांगता करण्यात आली. त्यांनी संपुर्ण ग्रंथाचा आशय यावेळी स्पष्ट केला. या विचाराने वागल्यास, पंचशिलेचा विचार अंगिकारल्यास मानवाला सुख-समृद्धी मिळेल असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.
श्रावस्ती नगरातील महिलांनी ग्रंथ पठणाचे काम करून जगाला शांतीचा संदेश देणार्‍या तथागताचा शांतीचा विचार हा जगाला तारणारा असल्याचा विचार यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून साहित्यिक पंजाबराव वर यांनी बोलतांना व्यक्त केले. डोंगरे सर यांनीही यावेळी अभ्यासपूर्ण भाषण केले. ग्रंथ समाप्ती कार्यक्रमाला श्रावस्ती महिला संघातील उपासिका सविता भगत, आशाताई इंगळे, आशाताई अबगड, सुजाता इंगोले, हिराताई इंगळे, मंदाताई वर,  दिपाताई प्रधान, शारीकला भगत, चांदणी विनोद वर, जयश्री कांबळे, विशाखा मनवर, रोहिणी गायकवाड, सिंधुताई गायकवाड, सुनंदा जामनीक, आशाताई मोहोड, डोंगरे ताई, वसूकर ताई, सोनिया तायडे, भिवगुडे ताई, दामोदर ताई. भारती वानखडे, कल्पना वानखडे. आश्विनी खाडे, विशाखा आठवले, चित्रलेखा भगत, खरात ताई,  चराटे ताई, जाधव ताई, खंडारे ताई, डॉ. मनिषा खंडारे, धांडे नाई, सोनाली खाडे नारी ललकारच्या कार्यकारी संपादिका सुनंदा वर आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे संचालन सविता भगत यांनी तर आभार प्रदर्शन आशा मोहोड यांनी मानले. स्नेह भोजनाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
श्रावस्ती नगर  नामफलकाचे अनावरण
यावेळी याच परिसराला श्रावस्ती नगर या नामफलकाचे अनावरण यावेळी करण्यात आले.  जगाला युद्धाची नव्हे तर बुद्ध विचाराची गरज असून बुद्धकालीन असलेले व सर्वांचे मंगल व्हावे या शुद्ध विचाराने ‘श्रावस्ती नगर’ या नामफलकाचे अनावरण यावेळी करण्यात आले. या कॉलनीतील धम्मउपासक, उपासिका यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

    Post Views:  58


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व