मुंबई- भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ‘आयएनएस विक्रांत’ युद्धनौका वाचविण्याच्या नावाखाली गोळा केलेल्या रकमेचे काय झाले? ती रक्कम कुठे गेली, असे प्रश्न शिवसेना खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केले आहेत. किरीट सोमय्यांनी गोळा केलेली रक्कम राजभवनाला मिळाली नसल्याचेही आरटीआयमधून समोर आले आहे. याचा तपास केंद्रीय तपास यंत्रणांनी करायला हवा, अशी मागणी त्यांनी केली.
संजय राऊतांनी दिल्लीत आज पुन्हा पत्रकार परिषद घेत किरीट सोमय्या यांच्यावर आरोप केले आहेत. तसेच राज्याचे विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर देखील टीका केली आहे. देवेंद्र फडणवीसांचा मला आश्चर्य वाटतं. देशद्रोही सोमय्यांची फडणवीस वकिली करत आहेत. अशा भ्रष्टाचार करणाऱ्यांना फडणवीसांनी जोडे मारले पाहिजे, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे.
आज महाराष्ट्रात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सूचनेनुसार महाराष्ट्रभर आंदोलन होणार आहे. आम्ही स्वस्थ बसणार नाही. देशद्रोही लोकांना तुरुंगात टाकू. देशभक्तीचे. हिंदुत्वाचे मुखवटे लावून लोकांना मूर्ख बनवण्याचे जे उद्योग चालवल आहेत ते गळून पडले आहोत, असा अप्रत्यक्ष टोला देशाचे गृहमंत्री आणि भाजपचे नेते अमित शााहा यांना लगावला आहे. भविष्यात मी अजून काही विषय मांडणार आहे, असा इशारा यावेळी संजय राऊतांनी दिला.
संजय राऊत यांनी आज नेमकं काय म्हणाले, पाहा-
१. भ्रष्टाचार करणारे सोमय्या पिता-पूत्र जेलमध्ये जाणारच
२. देशद्रोही सोमय्यांची देवेंद्र फडणवीस वकिली केली.
३. राजभवनाने पुरावे देऊन फडणवीसांनी सोमय्यांची बाजू घेतल्याचं मला आश्चर्य वाटतं.
४. आयएनएस विक्रांतचा सोमय्यांनी लिलाव मांडला.
५. भ्रष्टाचारविरोधात महाराष्टभर आंदोलन उभारणार
६. गद्दाराला महाराष्ट्राच्या मातीत गाढल्याशिवाय राहणार नाही.
७. आयएनएस विक्रांतसाठी जमवलेले पैसे सोमय्यांनी निवडणुकीत वापरले.
८. पैसे जमा करण्यासाठी ७०० बॉक्स वापरले, सगळे पैसे मुलूंडमधील कार्यालयात ठेवले.
९. या घोटाळ्यासाठी किरीट सोमय्यांनी पीएमसी बँकेत वापर केला.
१०. देवेंद्र फडणवीसांनी या भ्रष्टाचारी सोमय्यांना जोडे मारले पाहिजेत.
११. फडणवीस यांच्या या पावित्र्याने स्वर्गीय गोळवलकर गुरुजी, देवरस, रज्जू भैय्या, श्यामाप्रसाद मुखर्जी यांचा आत्मा तीळ तीळ तुटत असेल.
१२. देशद्रोही लोकांना तुरुंगात टाकू. देशभक्तीचे. हिंदुत्वाचे मुखवटे लावून लोकांना मूर्ख बनवण्याचे जे उद्योग चालवल आहेत ते गळून पडले आहोत.
Post Views: 299
सर्व
सर्व
admin@sanjay
admin@Sanjay