मणिभाई मानवसेवा ट्रस्टच्या वतीने सरदार वल्लभभाई पटेल जयंती दिनी पुरस्कार वितरण


 विश्वप्रभात न्यूज ब्युरो  2022-10-06
   

पुणे : सामाजिक, शैक्षणिक, आध्यत्मिक  आणि प्रबोधन,जागृती,अशा विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या उरळी कांचनच्या मणिभाई देसाई मानवसेवा ट्रस्टच्या वतीने दि.३१ आक्टोंबर २०२२ रोजी भारतरत्न  लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल जयंती समारंभ आयोजित करण्यात आलेला आहे.या कार्यक्रमात भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात राष्ट्रीय एकात्मतता परिषदेत विविध कार्यक्रमांसोबतच अनेक वक्त्यांचे मार्गदर्शन आणि अनेक क्षेत्रात उल्लेखनिय नेत्रदिपक कार्य करणाऱ्या सन्माननिय व्यक्तींचा वेगवेगळ्या पुरस्कारांनी गौरव करण्यात येणार आहे.
             डॉ.बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन,सरदार वल्लभभाई पटेल चौक,मंगळवारपेठ,पुणे येथे हा कार्यक्रम संपन्न होणार आहे.
यावेळी आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्यात सामाजिक,पत्रकारिता,साहित्यिक, आध्यात्मिक, वैद्यकीय,शैक्षणिक,क्रिडा,युवा कल्याण,वृक्षारोपण,अपंगसेवा क्षेत्रातील समाजसेवकांना त्याचप्रमाणे प्रवचनकार,किर्तनकार,प्रबोधनकार,संगीतकार,आदर्श शिक्षक, कम्युनिटी हेल्थ वर्कर,तथा राष्ट्रहिताच्या भावनेतून विविध क्षेत्रात सामाजिक कार्य करतांना पुरस्कृत केले जाणार आहे.
          निती आयोग संलग्नित मणिभाई देसाई मानवसेवा ट्रस्ट व डॉ.रविन्द्र भोळे आरोग्यसेवा केंद्राच्या वतीने  हा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे.या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी व पुरस्कारासाठी प्रस्तावासंदर्भात माहितीसाठी ९४२०१७३४४२ व ७५०७०३९५४ या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन मणिभाई मानवसेवा ट्रस्टचे संस्थापक- अध्यक्ष,लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ या समाजाभिमुख राष्ट्रीय संघटनेचे मार्गदर्शक पदाधिकारी ज्येष्ठ समाजसेवक,प्रवचनकार डॉ.रविन्द्र भोळे यांनी केले आहे.

    Post Views:  209


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व