आ. अमोल मिटकरी यांचे मार्गदर्शनात जागतिक आदिवासी दिवस साजरा
अकोला : अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद विदर्भ शाखा अकोला द्वारा आयोजित ९ ऑगस्ट २०२५ विश्व आदिवासी दिवस म्हणून युनोने मान्यता दिली आहे, हा दिवस विधान परिषदेचे लोकप्रिय आमदार अमोल मिटकरी यांचे प्रमुख उपस्थितीत साजरा करण्यात आला. विश्व आदिवासी परिषदेचे कार्यक्रमाचे अध्यक्ष अजाबराव उईके होते तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून आमदार अमोलदादा मिटकरी, मा. नगरसेवक अजय गावंडे, डॉ. आशिष चाफे, प्रतिभाताई अवचार (जिल्हाध्यक्षा महिला आघाडी रा.काँ.), आशाताई शिंदे, राठोड मॅडम, साहित्यिक पंजाबराव वर, अॅड. हेमंत सपाटे, राहुल इंगोले, संतोष राठोड, अॅड. महेंद्रसिंग सोळंके आदींची उपस्थिती होती. सर्वप्रथम मान्यवरांनी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महानायक बिरसा मुंडा यांच्या प्रतिमांचे पूजन केले. आदिवासी बांधवांनी शिक्षणाची कास धरावी, भलेही शोकपाणी अर्ध्यावर करा परंतू मुलाबाळांचे शिक्षणासाठी खर्च करा, या शिक्षणामुळेच तुमची प्रगती शक्य असल्याचे तसेच स्वयंप्रकाशित व्हा, कोणत्याही दगडधोंंड्याच्या मागे न लागता अंधश्रद्धेला दूर सारा, आदिवासी बांधवांना असे मोलाचे मार्गदर्शन आ. मिटकरी यांनी केले.
यावेळी किसनराव शेगोकार यांना जिवनगौरव पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला तर अॅड. महेंद्रसिंग सोळंके, तुळशिराम सोळंके, हिरामण कुंभरे, योगेश फुरसंगे, राजुभाऊ गोदेकर, जयसिंग मडावी, वत्सलाबाई सोळंके, रामाभाऊ डाबेराव, तुषार सराटे, हेमंत डाखोरे, प्रकाश ताराम आदीं समाजबांधवांचा आमदार महोदयांचे हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला यमुनाबाई टेकाम, यडमे मॅडम, सिंधुबाई उईके, गजानन ठाकरे, संदीप खुळे, संजय डाखोरे, टेकाम साहेब, शांताबाई कुंभरे, समय भी. उपर्वट आदींची उपस्थिती होती. प्रास्ताविक अजाबराव उईके यांनी तर कार्यक्रमाचे बहारदार संचालन व आभार प्रदर्शन साहित्यिक पंजाबराव वर यांनी केले.
Post Views: 97