कलाविष्कारच्या संमेलन अध्यक्षपदी सुरेश पाचकवडे


 संजय देशमुख  02 Dec 2021, 1:22 PM
   


अकोला ः भगोरा येथील कलाविष्कार संस्थेच्यावतीने 19 डिसेंबर 2021 रोजी मूर्तिजापूर येथे होवू घातलेल्या पहिल्या कलाविष्कार संमेलनाच्या अध्यक्षपदी सुप्रसिद्ध साहित्यिक सुरेश पाचकवडे यांची एकमताने निवड करण्यात आल आहे. 
या संमेलनाचे उद्घाटक म्हणून समाजसेवक प्रा.डॉ. संतोष हुशे असतील तर स्वागताध्यक्षपदी (सभापती शिक्षण व बांधकाम विभाग जि.प. अकोला) मा. सम्राटभाऊ डोंगरदिवे राहतील तसेच गझलनवाज भीमराव पांचाळे, नाट्यकर्मी डॉ. रमेशजी थोरात हे उपस्थित राहणार आहेत.  सुरेश पाचकवडे यांचे तीन काव्यसंग्रह आणि तीन कथासंग्रह प्रकाशित असून त्यांच्या एका कथासंग्रहाला महाराष्ट्र शासनाचा पू.भा. भावे पुरस्कार प्राप्त झाला आहे. आणि इतर पुरस्कारानेही ते सन्मानित झाले आहेत. 
शुभम बालसाहित्य संमेलन, अंकुर मराठी साहित्य संमेलन व सृजन साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचा बहुमान त्यांना यापूर्वी मिळालेला आहे.  पाचकवडे यांची या संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल मराठी साहित्य क्षेत्रात त्यांचे स्वागत होत आहे.

    Post Views:  318


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व