जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चिंचोली गणू अंतर्गत शाळा प्रवेश कार्यक्रम मोठ्या उल्हासाने साजरा


 संजय देशमुख  2023-07-02
   

अकोला- जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चिंचोली गणू अंतर्गत शाळा प्रवेश कार्यक्रम मोठ्या  उल्हासाने साजरा करण्यात आला. याप्रसंगी  शाळेमध्ये प्रवेश दिंडीचे भव्य स्वरूपात आयोजन करण्यात आले. वर्ग पहिली मध्ये दाखल झालेल्या नवागत विद्यार्थ्याचे शाळा व्यवस्थापन समितीचे  अध्यक्ष श्री ज्ञानदेव अंभोरे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन  स्वागत करण्यात आले. 
         इयत्ता पहिली ते आठवी मधील विद्यार्थ्यांना पुस्तकाचे वाटप करण्यात आले.यावेळी मान्यवराच्या हस्ते मुलांना नवीन ड्रेस वाटप सुध्दा करण्यात आले. याप्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ विमल शिवचरण डोंगरे, श्री मुरलीधर रेवास्कर श्री दिनेश भटकर विकास वाडकर, श्री सुनील बाहे  व सौ संगीता भटकर यांनी सुद्धा विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. विद्यार्थ्यांना मिठाईचे वाटप करून या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.या कार्यक्रमाला गावातील प्रतिष्ठित व्यक्ती व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

    Post Views:  328


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व