दि.१० रोजी सुफी संत शेख महंमद बाबा यांचा ४०७ वा संदल-उरुस यात्रा उत्सव


 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  03 Mar 2025, 11:17 AM
   

वैभव हराळ,जिल्हा प्रतिनिधी 
श्रीगोंदा: छत्रपती शिवाजी महाराज यांचे आजोबा श्रीमंत मालोजी राजे भोसले यांचे गुरू सर्वधर्मीयांचे श्रद्धास्थान सुफी संत शेख महंमद बाबा यांचा ४०७ वा संदल- उरुस, यात्रा उत्सव दि. १० मार्च २०२५ रोजी होणार असुन त्या निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याचे शेख महंमद बाबा यांचे वंशज व शेख महंमद बाबा ट्रस्ट चे अध्यक्ष आमीनभाई शेख यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगीतले.
पुढे बोलताना शेख म्हणाले की, हा संदल-उरुस, यात्रा उत्सव पारंपारीक पद्धतीने दरवर्षी मोठ्या उत्सवाने साजरा करण्यात येतो. हा. उत्सव सर्व धर्मीय बांधव मोठ्या उत्सहात साजरा करतात, या उत्सवा दिवशी पोलीस प्रशासनाची मानाची चादर बाबांच्या कबरीवर चढवली (अर्पण) केली जाते. तसेच संदल-उरूस, यात्रा निमित्त श्रीगोंद्यासह राज्यातून हिंदू-मुस्लिम भाविक भक्त मोठ्य प्रमाणात दर्शनासाठी (जिआरत) येतात. भाविक वाजत-गाजत चादर, शेरणी, नवैद्य अर्पण करून भावीक आपले नवस फेडतात.
शेख महंमद बाबां यांच्या ४०७ व्या संदल-उरूस, यात्रा उत्सव निमित्त शुक्रवार दि.०७ मार्च, कुरान खाणी (कुराण पठण), दि.०८ मार्च रोजी रात्री ९.३०. वा. गुजरात चे सुप्रसिद्ध कव्वाल सिराज चिश्ती यांचा जंगी कव्वाली (भक्तीगित) कार्यक्रम., तसेच रात्री ११ वा. संदल (चंदन), गुस्लखानी, चिराग-ए-रोशन, कार्यक्रम, महाप्रसाद, दि.०९ रोजी सायंकाळी लंगरखाना, महाप्रसाद, मिलाद शरिफ (प्रवचण), बाबांच्या कार्याची माहिती देणे.तर दि.१० रोजी उरुस (यात्रा) जियारत, भाविक भक्त बाबांच्या कबरीवर फुलांची व कापडी गलफ चादर, मलिदा, गुळ, पेढा, नारळ, प्रसाद शेरणी काढत अर्पण करतात. दि.११ - दुपारी २ वाजता कुस्त्यांचा जंगी हगामा (आखाडा) कार्यक्रम संपन्न हेणार आहेत.
सर्व कार्यक्रमाचा भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा असे आवाहन शेख महंमद बाबा दर्गाह ट्रस्ट च्या वतीने करण्यात आले आहे.
 यावेळी ट्रस्टचे बंडूभाई शेख,अल्लीभाई शेख,राजुभाई शेख,अजीजभाई शेख,राजू भाई शेख,चांदभाई शेख,शाहरुख शेख,तौसिफ शेख,सोहेल शेख,रेहान शेख,अरमान शेख,सुफियान शेख आदींसह उपस्थित होते.

    Post Views:  189


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व