महिला पत्रकार स्नेहा बारवेवर खुनी हल्ला करणार्‍या बिल्डर मोरडेवर पत्रकार संरक्षण कायद्या अंतर्गत गुन्हे दाखल करा


लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे जिल्हा पोलीस अधिक्षकांना निवेदन
 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  16 Jul 2025, 3:03 PM
   

अकोला : मंचर ता. आंबेगाव जि. पुणे येथील बाजारतळाच्या शेजारी असणार्‍या ओढ्यावर अतिक्रमण झाल्याने पुराचे पाणी पुलावर आणि बाजारात घुसण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. या संदर्भात (४ जुलै २०२५) बातमी करण्यासाठी गेलेल्या पत्रकार स्नेहा बारवे यांच्यावर वृत्तांकन सुरू असतानाच बिल्डर पांडुरंग मोरडे यांनी खुनी हल्ला करून जिवे मारण्याचा प्रयत्न केला आहे, या गुन्हेगारावर पत्रकार संरक्षण कायद्या अंतर्गत गुन्हे दाखल करण्याच्या मागणीसाठी लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष संजय देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हाप्रमुख पंजाबराव वर ग्रामीण जिल्हाध्यक्ष सागर लोडम यांचे नेतृत्वात होम डिवाएसपी आनंद महाजन यांना निवेदन देण्यात आले.  
पुणे जिल्ह्यातील मंचर येथे गुन्हेगारी पार्श्वभूमी असणार्‍या पांडुरंग मोरडे नावाच्या इसमाने नाल्यावर मोठी भिंत बांधून जवळपास ५०० ब्रास दगड, मुरूम टाकून भराव करून गाळे बांधण्याचे काम ़केल्याने  ओढ्यावरील पूल आणि शहरात पाणी घुसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. वृत्तांकनासाठी गेलेल्या स्नेहा बारवे यांच्यावर  लाकडी दांडक्याने डोक्यावर, पाठीवर आणि कमरेवर हल्ला करून पत्रकार स्नेहा बारवे पहिल्याच फटक्यात जमिनीवर कोसळल्या.  त्यांना मंचर येथील उपजिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आले. येथील डॉक्टरांनी प्राथमिक उपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी पिंपरी येथील डी वाय पाटील रुग्णालयात पाठविले.  पांडुरंग मोरडे यांनी बोलाविलेल्या इतर गुंडांनी मारहाण प्रकरणात हस्तक्षेप करणार्‍यांनाही जबर मारहाण केली. या मारहाणीत मध्यस्थांनाही दुखापत झाली असून; वासुदेव काळे यांनी याबाबत मंचर पोलिसांत फिर्याद दिली. या पैशाचा माज असणार्‍या पांडुरंग मोरडेवर खुनाचा प्रयत्न आणि पत्रकार संरक्षण कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्याबाबत निवेदन दिले. पोलीस कारवाई करत नसल्याने गुन्हेगारीमध्ये वाढ होत आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष पंजाबराव वर, ग्रामीण जिल्हाध्यक्ष सागर लोडम, विभागीय संघटक संतोष धरमकर, जिल्हाकार्याध्यक्ष डॉ. संजय निकस पाटील, जिल्हाउपाध्यक्ष संघपाल शिरसाट, जिल्हाउपाध्यक्ष (ग्रामीण) रमेश समुद्रे, मिलिंद इंगळे, सचिव मनोहर मोहोड, सहसचिव दिलीप नवले, फुलचंद मौर्य, संतोष मोरे, जिल्हा संघटक दिपक शिरसाट, नरेंद्र वि. देशमुख, एजाज अहमद खान, अर्जूनराव घुगे, रितेश वानखडे होते असे प्रसिद्धीप्रमुख योगेश शिरसाट यांनी कळविले.

    Post Views:  67


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व