शिशुविहार प्राथमिक शाळा विद्यापीठ प्रशालेचा प्रवेशोत्सव साजरा


शाळेच्या मुकूटमणी माजी विद्यार्थ्यांसोबतचा अभिनव कार्यक्रम
 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  22 Jun 2024, 10:19 AM
   

पूणे - शाळेच्या ५१ व्या वाढदिवसानिमित्त माजी विद्यार्थिनी स्मिता कुर्वे या प्रवेशोत्सव कार्यक्रमास उपस्थित राहिल्या व त्यांनी विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधला. तसेच विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्षासाठी शुभेच्छा दिल्या. कसबा गणपती गणेशोत्सव मंडळाकडून हुशार व गरजू विद्यार्थ्यांसाठी मिळालेल्या शालेय मदतीचा धनादेश त्यांनी मुख्याध्यापिका  विजया बराटे यांच्याकडे सुपूर्त केला. पाहुण्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, नवीन पाठ्यपुस्तके यांचे वितरण करण्यात आले. आनंददायी शिक्षणातून शिक्षणाविषयी गोडी निर्माण व्हावी या हेतूने मोठ्या उत्साहात प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला. शालेय साहित्य मिळाल्यानं विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त केला.भविष्यात आम्हीही अशीच शाळेला सक्रिय मदत करू असे आश्वासन विद्यार्थ्यांनी पाहुण्यांना दिले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनिता वांजळे यांनी केले. पाहुण्यांचा परिचय राजश्री शिंदे यांनी तर आभार  श्रीकांत आगवणे यांनी मानले.कार्यक्रमास शाळेच्या शाला समिती अध्यक्षा सविता काजरेकर, सदस्या सीमा कांबळे यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रम प्रसंगी शिशुविहार प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका विजया बराटे, विद्यापीठ हायस्कूलचे मुख्याध्यापक विष्णू मोरे, सुनिता वांजळे,राजश्री शिंदे, श्रीकांत आगवणे, शिक्षक -
शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

    Post Views:  194


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व