अकोल्यातील डॉक्टर श्रद्धा गुप्ता (खंडेलवाल) यांनी नीट (एमडीएस )परीक्षेमध्ये ऑल इंडिया रँक 184 प्राप्त करून बाजी मारली आहे.
स्थानिक केडिया प्लॉट येतील राहुल गुप्ता व सुश्मिता गुप्ता यांची श्रद्धा कन्या असून, तिने नागपूरच्या सरकारी डेंटल कॉलेजमधून आपली बीडीएस ही पदवी प्राप्त केली आहे. सुरुवातीपासूनच अभ्यासू व हुशार असणाऱ्या श्रद्धाने बीडीएसला सुद्धा प्राविण्य मिळवले होते. आता उच्च शिक्षणासाठी म्हणजेच एमडीएस करण्यासाठी च्या नीट परीक्षेत तिने संपूर्ण भारतातून चांगला क्रमांक प्राप्त केला आहे. श्रद्धा यांनी मिळवलेल्या या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
Post Views: 3