जिल्ह्यातील विकास कामात स्व नानासाहेब वैराळे यांचे मोठे योगदान ! : आ. किरण सरनाईक


 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  12 Nov 2022, 8:24 AM
   

अकोला : अकोला जिल्ह्यातील बाळापुर तालुक्यातील दुर्गम भागात असलेले बोरगाव वैराळे गाव आणि या गावात स्व मधुसुदन ऊर्फ नानासाहेब वैराळे सारखा दुरदुष्टी असलेला लोकनेता जन्माला येऊन या लोकनेत्याने राष्ट्रीय राजकारणात आपला वेगळा ठसा उमटवीत अकोला व वाशिम असा संयुक्त असलेल्या जिल्ह्यातील १३ तालुक्यात अनेक विकासाच्या योजना आणून मोठमोठे प्रकल्प उभे केले असून जिल्हयाच्या विकासकामात स्व नानासाहेब वैराळे महत्वपूर्ण योगदान असल्याचे प्रतिपादन शिक्षक आ किरण सरनाईक केले.

      पुढे बोलताना ते म्हणाले की स्व नानासाहेब वैराळे व सरनाईक कुटुंबाचे घरोब्याचे संबंध होते माझी आई मालतीबाई सरनाईक यांना विधान परिषदेवर आमदार म्हणून पाठविले होते त्या काळात असणारे राजकारण हे विकासाचे होते व महिलांना त्या काळात पुरूष मंडळी राजकारणात येऊ देत नव्हत्या परंतु महिला देखील राजकारणात सक्रिय सहभागी झाल्या पाहिजेत म्हणून माझ्या आईला आमदार करण्याच्या काम स्व नानासाहेबांनी केले त्यावरून त्यांची दुरदृष्टी लक्षात येईल अकोला जिल्ह्यात काटेपुर्णा, महान,वान प्रकल्प, नागपूरचे विधानभवन, जिल्ह्यातील महामार्ग,गावाला जोडणारे अंतर्गत रस्ते, अकोला आकाशवाणी, रेल्वे चा विस्तार, पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाचा लढा अशी जिल्ह्यातील महत्वपूर्ण विकासकामे स्व नानासाहेब वैराळे यांच्या काळात झाले महाराष्ट्रात १४ वर्ष मंत्री दोन वेळा  खासदार, देशाच्या लोकलेखा समितीचे अध्यक्ष, खासदार असताना ११ देशाचा अभ्यास दौरा केला , दै देशोन्नती पेपर चे संस्थापक, चार पुस्तकाचे लेखन केले स्व नानासाहेब वैराळे यांच्या बाबतीत सांगायचं झाले तर माझे शब्द कमी पडतात असे बहुआयामी व्यक्तिमत्त्वाचे ते धनी होते. या जयंती उत्सवानिमित्त कचरा कुंड्या वाटप, आरो प्लांट चे उद्घाटन, तसेच महिला बचत गट उत्पादक कंपनीच्या कार्यालयाचे उद्घाटन आधी विविध कार्यक्रमाचे आयोजन यावेळी करण्यात आले होते .  या कार्यक्रमाला समाजसेवक गजानन हरणे, दीपक बिडकर ,सरपंच कल्पना विनायक वैराळे, उपसरपंच राजेश्वर वैराळे, तंटामुक्त समिती अध्यक्ष विठ्ठल वैराळे, सेवा सहकारी सोसायटी अध्यक्ष सदाशिव गावंडे, ग्रामपंचायत सदस्य माणिकराव वानखडे, श्रीराम वेते,पुष्पाताई प्रदीप वाकोडे, दिपाली गोपाल बाहकर, रामदास थारकर, पांडुरंग बाहकर, पुंजाजी अमरावते, रामराव शेळके, दिलीप इंगळे, राजेश दयाराम वैराळे, मंगला सुर्यवंशी, वनमाला बोक्से, मुक्ता वैराळे, प्रीती गावंडे, ज्योती गावंडे, इंदू सुर्यवंशी, वर्षा वैराळे, विद्या गोसावी, सचिन जाणे,मारोती मात्रे, गजानन पारिसे, दत्ताभाऊ सुरतकार,पुरूषोत्तम शेळके, मनिष वैराळे, अक्षय वैराळे, मुख्याध्यापक संदीप मोरे,नंदकुमार ठाकरे,योगेश राऊत, दिलिप डोंगरे, आंग्रे सर,धनोकार सर,पाटील सर आदीसह गावातील महिला पुरुष युवक युती मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन विठ्ठल वैराळे आभार प्रदर्शन उपसरपंच राजेश्वर वैराळे यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्याकरता ग्रामपंचायत शिक्षण समिती तंटामुक्त समिती जिल्हा परिषद शाळेचे कर्मचारी व गावकऱ्यांनी परिश्रम घेतले.

    Post Views:  418


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व