न्यू तापडिया नगर येथे शिवजयंती निमित्त सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन


 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  21 Feb 2024, 8:58 AM
   

अकोला -  न्यू तापडिया नगर येथे आधार फाउंडेशनच्या वतीने शिवजयंती निमित्त जल्लोष 2024 या सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये सोलो डान्स, ग्रुप डान्स, फॅन्सी ड्रेस स्पर्धा, उखाणे स्पर्धा आधी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये प्रभागातील 74 मुला-मुलींनी तर 13 महिलांनी कार्यक्रमात आपली कला सादर करून सहभाग घेतला कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून प्राध्यापिका अंजलीताई आंबेडकर ह्या तर प्रमुख उपस्थिती म्हणून डॉ. मयुरी महाजन डॉ. गायत्री देशमुख सामाजिक कार्यकर्ते दिलीप सावरकर आधार चे अध्यक्ष माणिक शेळके हे होते. स्पर्धेचे परीक्षक म्हणून प्रा. कुसुम मसनकर व प्रा.अनिरुद्ध दळवी यांनी जबाबदारी सांभाळली.

लहान मुलांच्या डान्स मध्ये प्रथम क्रमांक रक्षिता पाटील, अनुक्रमे अन्वी सरकटे, राजवीर ठाकूर यांनी पटकावले. तर महिलांमधून अश्विनी कुलकर्णी हिने प्रथम पारितोषिक मिळवले, फॅन्सी ड्रेस स्पर्धेत वेरोनिका यादव हिने भारत मातेची वेशभूषा साकारत प्रथम क्रमांक पटकावला. कार्यक्रमाचे आकर्षण ठरलेल्या उखाणे स्पर्धेत सौ. श्वेता यादव यांनी 1 मिनिटात 14 उखाणे घेत विजय मिळवला. या सांस्कृतिक कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेल्या प्राध्यापिका अंजलीताई आंबेडकर यांनी सहभागी सर्व स्पर्धकांचे कौतुक करून त्यांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे बहादार संचालन नितीन ढोरे सर यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आधारचे उपाध्यक्ष राहुल ठाकूर, गौरव पांडे, सुशील ठाकरे, मंगल इंगळे, सुमित ठाकरे, सुनील आंबुसकर, प्रतीक देशमुख, समर्थ कराळे, मिहीर मुंग्यालकर, रितेश यादव, महेश गोरे, दुर्गेश कोपेकर, अमर लहरिया, केवल ठाकूर आदींनी परिश्रम घेतले

    Post Views:  161


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व