श्री शिवाजी विद्यालय व क.म.वि.राजंदा येथे ग्रामगौरव व संवाद सभेचे आयोजन
विश्वप्रभात न्यूज ब्युरो
15 Apr 2023, 5:59 PM
श्री शिवाजी विद्यालय व क. म. वि. राजंदा येथे शिक्षणमहर्षी, कृषिरत्न डॉ. पंजाबराव देशमुख यांची 58वी पुण्यतिथी, तसेच क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले तसेच विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 132वी जयंती या त्रिवेणी संगमाचे औचित्य साधून दि.14एप्रिल 2023 रोजी ग्रामगौरव व संवाद सभेचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा श्री माणिकराव वणवे तर प्रमुख अतिथी म्हणून श्री गणेशजी बोबडे,श्री गोपाळराव महल्ले, श्री राहुलभाऊ अरखराव, श्री कृष्णराव सोळंके, श्री राजूभाऊ सोळंके, श्री गजाननराव मुंढे, श्री दिवनाले साहेब, डॉ मुंढे, प्राचार्य एम. बी. देशमुख उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. त्यानंतर कु. चैताली गणेश तायडे या विद्यार्थिनीने व श्री वानखडे सरांनी बाबासाहेबांचे गौरव गीत सादर केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक मा प्राचार्य एम. बी. देशमुख सर यांनी केले. यानंतर राजंदा गावातील कर्तबगार स्त्री व पुरुष यांचा मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ व पुष्प देऊन यथोचित सत्कार करण्यात आला. या प्रसंगी कु आरती गिते, कु ऋतुजा अरखराव, कु आरती केदार या विद्यार्थिनींनी, श्री डी.व्ही.हुरसाळ सरांनी व उपस्थित मान्यवरांनी या तिन्ही महामानवांच्या जीवनावर प्रकाश टाकला. कार्यक्रमाचे संचालन श्री व्ही. एन. ढुके यांनी केले व आभार श्री एस.सी.बैस यांनी मानले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली. यावेळी गावकरी,सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
Post Views: 283