मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाऊंडेशनच्या रेस्क्यु टीम ने वळुला रेस्क्यु करुन जिवनदान
विश्वाप्रभात न्यूज ब्युरो
24 Jun 2024, 3:41 PM
बाहेर काढल्यानंतर बेशुद्ध अवस्थेत असलेल्या वळुला जिवरक्षक दिपक सदाफळे यांनी सीपीआर व प्रथमोपचार उपचार करून उठून उभे केले ही विश्वास न बसणारी कार्यवाही यशस्वी होताच उपस्थित नागरिकांसह महीलांनी हर हर महादेवाचा गजरच केला ही विश्वास न बसणारी अशी प्रक्रिया उपस्थितांना प्रथमच पाहायला मिळाली.
मानव सेवा आपत्ती व्यवस्थापनाच्या संत गाडगे बाबा आपात्कालीन शोध व बचाव पथकाच्या रेस्क्यु टीमची विशेष धाडसी कामगीरी जिद्द कसोसी व कल्पकतेतून पाच तासाच्या अथक प्रयत्नांनंतर शेवटी उपस्थितांना न पटणारे व कोणत्याच परीस्थीतीत हे शक्य नसणारे रेस्क्यु ऑपरेशन यशस्वी केलेच
आज सकाळी 9:00 वाजता पिंजर शहरातील वार्डा क्रमांक 2 मधील विहरीत मोठा नंदी (वळु) पडल्याची माहीती ब-याच नागरीकांनी येथलच मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाऊंडेशनच्या संत गाडगे बाबा आपात्कालीन शोध व बचाव पथकाचे प्रमुख जिवरक्षक दिपक सदाफळे यांना दिली क्षणाचाही विलंब न करत वायर रोप सेटप, सेप्टी बेल्ट्स,रॅम्प,होर्नेक्स, सीट बेल्ट,राॅड, कॅराबिनर, फीगर येठ,हेल्मेट टॉर्च, आणी आपले सर्व गावातील सहकारी घटनास्थळावर बोलावून घेतले दहा मिनटात 50 ते 70 सहकारी हजर झाले,घटनास्थळ ट्रेस केले असता विहीर ही 40 फुट खोल आणी 4 फुट अरुंद होती अन त्यातही कपारी यात फसलेला वळु पाहता कोणत्याच परीस्थीतीत काढण शक्य नव्हते तेही जिवंत तर बिलकुलच नाहीच यात जिवरक्षक दिपक सदाफळे यांचा आपत्ती व्यवस्थापनाचा 25 वर्षांचा दांडगा अनुभव असल्याने जिद्द कसोसीने कल्पकतेतून शेवटी पाच तासाच्या अथक प्रयत्नांनंतर वळुला जिवंत व तेही सुखरूप बाहेर काढलेच बाहेर काढल्यानंतर तो नंदी कुठली हालचाल न करता बेशुद्ध अवस्थेत होता पण जिवरक्षक दिपक सदाफळे हे सीपीआर व प्रथमोपचार उपचारात अतिशय एक्सपर्ट असल्याने त्यांनी वळुला सीपीआर चार प्रकार ची आपली स्टेप वापरून CPR चालु केले नंतर वळुला रिकव्हर पोजिशनवर घेतले आणी नंतर थंडगार पाण्याने हेड कुलिंग केले यानंतर चार प्रेशर पाॅईन्ट देऊन पुन्हा CPR चालुच ठेवले यात कार्यवाहीत चक्क वळु ऊठुन चालायला लागला तेव्हा उपस्थित नागरिकांसह महीलांनीही हर हर महादेव चा गजर केला.आत मधे जाणे सुद्धा शक्य होत नव्हते होर्नेक्स लावुन आकाश मनवर याला चार ते पाच वेळा खाली पाठवुन बॅकप करायचे प्रयत्न केले परंतु काहीच करता येत नव्हते चारही पाय खाली आणी स्पेस कमी असल्याने बुळात वळु पॅक झाला होता असे विचित्र व अडीअडचणीचे ऑपरेशन शेवटी यशस्वी केलेच वळुसह कोणालाही दुखापत होणार नाही आणी यामुळेच एखादी दुसरी दुर्घटना होणार याची मात्र जिवरक्षक दिपक सदाफळे यांनी पुरेपूर तंतोतंत विशेष काळजी घेण्यात आली. कारण वळुला सहा वायररोपनी बॅकपॅक केलेले होते आणी चार मानविय साखळ्या करुन वळुला वर ओढण्याची जबाबदारी देण्यात आली होती वळु अशावेळेस वळु अर्ध्यावर आल्यानंतर वजन कॅपिसीटीची आणी बॅलेंस लक्षात घेता पुर्ण वायररोपला जोरदार प्रेशर आलेले असते यामुळे रोप घासला कीवा एकदोन तुटले तर खुप मोठी दुर्घटना होण्याची दाट शक्यता असते हेच संभाव्य धोके लक्षात घेऊन दिपक सदाफळे हे टेक्निकली बारीकसारीक पाॅईन्ट सह सहभागी प्रत्येकांकडे बारकाईने लक्ष ठेवून होते आधीच सर्वांनाच इंट्रकशन्स देऊन अवगत केले होते. या यशस्वी ऑपरेशन चे मोठे आज समाधान वाटत आहे.या रेस्क्यु आपरेशन मधे पथकाचे जवानांसह विशेष गावातील तरुणांनी नागरिकांनी मोलाचे सहकार्य केले विठ्ठल वडुरकर यांनी स्वता हजर राहुन जेसीबी उपलब्ध करून दीली,संतोष आप्पा विभुते यांनी ट्रॅक्टरसह योगेश विभुते हे हजर झाले राधेश्याम सारस्कर यांनी चैन ब्लॉक आणुन दीला.असे सहकार्य लाभले आवेळी रमेश आप्पा खोबरे,माजी सरपंच अशोकराव लोणाग्रे, शाम बाप्पु देशमुख हजर होते,अशी माहीती पथक प्रमुख दिपक सदाफळे यांनी दीली.
Post Views: 88