श्रीमती ल. रा. तो. महाविद्यालयाच्या एन. सी. सी. कॅडेट्सनी केला आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा


 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  23 Jun 2025, 8:36 AM
   

बेरार जनरल एज्युकेशन सोसायटी द्वारा संचालित श्रीमती लक्ष्मीबाई राधाकिशन तोष्णीवाल वाणिज्य महाविद्यालय, अकोला येथील प्रांगणामध्ये राष्ट्रीय छात्र सेना (एन. सी. सी.) विभागामार्फत ११ व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाचे आयोजन करण्यात आले. महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. जी. जी. गोंडाने यांच्या मार्गदर्शनाखाली व एन. सी. सी. ऑफिसर कॅप्टन डॉ. अनिल तिरकर यांच्या नियोजनांतर्गत या योग दिनाचे आयोजन केले. यावर्षी योगासनाचे प्रशिक्षण देण्यासाठी योगा शिक्षक प्रा. डॉ. मोनिका तापडिया यांचे सहकार्य लाभले. या योग दिनाच्या कार्यक्रमासाठी डॉ. वंदना मिश्रा, डॉ. महेश डाबरे, डॉ. ज्योती माहेश्वरी, डॉ. स्वाती दामोदरे, डॉ. निलेश चोटिया, डॉ. नागनाथ गुट्टे तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. योग ही एक प्राचीन भारतीय पद्धत आहे जी असंख्य शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक फायदे देते . ती शारीरिक आसने (आसन), श्वास घेण्याच्या तंत्रे (प्राणायाम) आणि ध्यान यांचे संयोजन करून एकूण कल्याण आणि सुसंवादाची भावना निर्माण करते. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील सिनियर अंडर ऑफिसर स्वराज बोदडे, ज्युनिअर अंडर ऑफिसर सिमरन इंगळे, कॉर्पोरल प्रेम अहिर, कॉर्पोरल उर्मिला बुंदेले, कॉर्पोरल सारिका यादव, कॉर्पोरल शुभम दुबे, लान्स कॉर्पोरल कोमल मेश्राम, कॅडेट नयन घुगे, कॅडेट आयुष थोरात, कॅडेट रोहन मुरादे, कॅडेट अविनाश वाकोडे, कॅडेट हर्ष देवगिरकर , कॅडेट सुमित मंगरूळकर , कॅडेट क्रिश करवाडिया , कॅडेट पवन गिरी, कॅडेट निखिल सभादिंडे, कॅडेट धनराज जाहीर, कॅडेट निखिल मोरया, कॅडेट साक्षी झटाले, कॅडेट भूमि काशिद, कॅडेट लक्ष्मी सूळे, कॅडेट मोनिका दडगल, कॅडेट श्रद्धा पांडे, कॅडेट निशा अरुलकार,  कॅडेट प्राची वरुडकर, कॅडेट प्रेरणा गोतमारे, कॅडेट सनिका राजेधर, कॅडेट मानसी दळवी, कॅडेट तन्वी मालगन, कॅडेट निवेदिता भोसले, कॅडेट अनुश्री दाणे, कॅडेट पल्लवी शिरसाट, कॅडेट तृष्णा सिंग, कॅडेट जानवी पारस्कर, कॅडेट दिव्या बावस्कर, कॅडेट कल्याणी सोनुले, कॅडेट प्रांजल लांडगे, कॅडेट तृप्ती कोरडे असे एकूण ७२ एन. सी. सी. कॅडेटनी सहभाग घेतला होता. एन. सी. सी. कॅडेट्सनी राबविलेल्या या कार्यक्रमाबद्दल दि. बी.जी.ई. सोसायटीचे अध्यक्ष अॅड. मोतीसिंहजी मोहता, मानद सचिव डॉ. पवनजी माहेश्वरी, वरिष्ठ उपाध्यक्ष विजयकुमारजी तोष्णीवाल, कनिष्ठ उपाध्यक्ष इंजि. अभिजितजी परांजपे, सहसचिव सी.ए. विक्रमजी गोलेच्छा व समस्त कार्यकारी सदस्यांनी यांचे कौतुक करून अभिनंदन केले.

    Post Views:  31


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व