अकोला: अकोट फैल पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या आपातापा अकोला मार्गावर वाघोबा ढाब्याजवळ ट्रक दुचाकीचा अपघात झाल्याने एकाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली. विलास ठाकरे रा. तुकाराम चौक असे मृतकाचे नाव आहे.
आपातापा अकोला मार्गावर वाघोबा ढाब्याजवळ 12 चक्का टायरचा ट्रकने एमएच 30 टी 4418 क्रमांकाच्या दुचाकीला धडक दिली. या धडकेमध्ये दुचाकी स्वार घटनास्थळावर मृत्यू झाला आहे. विलास ठाकरे रा. तुकाराम चौक असे मृतकाचे नाव आहे. घटनेची माहिती मिळताच अकोट तालुका पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन घटनास्थळाचा पंचनामा केला. यावेळी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून मृतदेह उत्तरीय तपासणी करता पाठवला आहे. पोलिसांनी एका आरोपीस ताब्यात घेतले असून त्याची कसून चौकशी सुरू आहे. याप्रकरणी पोलीस निरीक्षक महेंद्र कदम यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक नितीन सुशिर हे अधिक तपास करीत आहेत.
Post Views: 473