दिशा पब्‍लिक स्‍कुलचा वर्धापन दिन मोठ्या उत्‍साहात साजरा


दिशा पब्‍लिक स्‍कुलच्‍या माध्यमातून आदर्श विद्यार्थ्यांची निर्मिती होणार- मा.देविदास गोरे
 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  22 Jul 2024, 12:36 PM
   

(संभाजी टाले)  खामगाव  : स्‍व.हिंम्‍मतराव महिला बहुउद्देशिय संस्‍थेद्वारा संचालित दिशा पब्‍लिक स्‍कुल कंझारा या कॉन्‍व्‍हेंटचा पहिला वर्धापन दिन २ जुलै रोजी मोठ्या हर्षोल्‍हासात साजरा झाला. यावेळी अनेक मान्‍यवरांची प्रामुख्याने उपस्‍थिती होती. या कार्यक्रमाच्‍या  अध्यक्षस्‍थानी मा.श्री.देविदास गोरे, सेवानिवृत्‍त संचालक औद्योगिक सुरक्षा व आरोग्‍य महाराष्ट्र राज्‍य त्‍याच प्रमाणे मा.श्री. एन.के.देशमुख केंद्र प्रमुख पंचायत समिती खामगाव, मा.संजय देशमुख लोकस्‍वातंत्र पत्रकार महासंघ चे राष्ट्रीय अध्यक्ष, ॲड. अमोल प्रा.डहाके संस्‍थाध्यक्ष श्री गुरुदेव इंग्‍लिश स्‍कुल ज्‍युनियर कॉलेज रोहणा, श्री पंजाबराव देशमुख अध्यक्ष मारोती संस्‍थान कंझारा, सौ.शुभांगी राजीव देशमुख संस्‍थाध्यक्ष, सौ. अलकाताई शेगोकार पोलीस पाटीलस कंझारा, प्रमोद देशमुख पोलिस पाटील तथा सामाजिक कार्यकर्ता निंबा यांची उपस्‍थिती होती. कार्यक्रमाच्‍या सुरुवातीला सरस्‍वती मातेचे पूजन  व दिपप्रज्‍वलन करण्यात आले. त्‍यानंतर छत्रपती शिवाजी महाराज तसेच शिक्षण महर्षी पंजाबरावजी देशमुख यांच्‍या प्रतिमेला माल्‍यार्पण करुन शाळेच्‍या प्रांगणामध्ये स्‍व.हिम्‍मतराव देशमुख यांच्‍या अर्धकृती पुतळ्यास मान्‍यवरीांच्‍या हस्‍ते हार अर्पण करण्यात आला. त्‍यानंतर आलेल्‍या मान्‍यवरांचा संस्‍थेद्वारा सत्‍कार करण्यात आला. व प्रामुख्याने स्‍व.हिम्‍मतराव देशमुख यांच्‍या धर्मपत्‍नी सुमित्रा देशमुख यांचाही सर्व मान्‍यवरांच्‍या हस्‍ते  करण्यात आला.
     यावेळी कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक सौ.अश्विनीताई देशमुख यांनी केले. व एका वर्षामध्ये या शाळेच्‍या माध्यमातून विद्यार्थ्यांना शारिरीक मानसिक, बौध्दीक शिक्षण कशा पध्दतीने देण्यात आले तसेच एक वर्ष या शाळेला पुर्ण झाले या एका वर्षाचा लेखाजोखा त्‍यांनी आपल्‍या प्रास्‍ताविकात मांडला. यावेळी शाळेतील चिमुकल्‍या विद्यार्थ्यांनी नृत्‍य व काही बहारदार प्रात्‍यक्षिके सादर केली. त्‍यांच्‍या नृत्‍यास व प्रात्‍यक्षिकास मान्‍यवरांच्‍या हस्‍ते अनेक बक्षीस सुुध्दा जाहीर झाले.         त्‍यानंतर या शाळेचे मार्गदर्शक राजीवजी देशमुख यांनी येणाऱ्या काळामध्ये अजून किती चांगल्‍यात चांगल्‍या पध्दतीने मुलांच्‍या उज्‍वल भविष्यासाठी शिक्षण देता येईल याचा उल्‍लेख त्‍यांनी आपल्‍या मनोगतात व्‍यक्‍त केला. मा. संजयजी देशमुख यांनी या शाळेचे काम अप्रिम आहे व ग्रामीण भागामध्ये दर्जेदार शिक्षण या स्‍कुलच्‍या माध्यमातून मिळत आहे. ही आनंदाची बाब आहे. तर अध्यक्षीय भाषणामध्ये मा.श्री. देविदास गोरे यांनी आपले मत व्‍यक्‍त करतांना सांगितले की, मुलांनी सादर केलेल्‍या डान्‍स व ॲक्‍टीव्‍हीटीज्‌ पाहून मी आश्चर्य व्‍यक्‍त करीत आहे. अवघ्या एका वर्षाच्‍याच कालखंडामध्ये चिमुकल्‍या बालकांनी सादर केलेल्‍या अप्रितम  प्रात्‍यक्षिके पाहून एकच आत्‍मविश्वासाने सांगावेसे वाटते की येणाऱ्या काळामध्ये दिशा पब्‍लिक स्‍कुलच्‍या माध्यमातून शिक्षण घेवून निघालेले विद्यार्थी हे निश्चितपणे यशाचे शिखर गाठतील. या स्‍कुलच्‍या माध्यमातून आदर्श विद्यार्थी निर्माण होणार यात तीळमात्रही शंका नाही असे ते बोलले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन पत्रकार संभाजीराव टाले यांनी तर आभार प्रदर्शन मोहन देशमुख यांनी केले. कार्यक्रमाकरिता शाळेचे  पंजाबराव देशमुख, पी.पी. चव्‍हाण, संजय देशमुख, गोंविंदराव देशमुख, मिना देशमुख, शुंभागी देशमुख, अश्विनी देशमुख, माधुरी देशमुख, सुमय्या खान, उषा तायडे यांनी परिश्रम घेतले.  या कार्यक्रमाकरिता कंझारा गावकऱ्यांची तसेच परिसरातील मान्‍यवरांची मोठ्या प्रमाणावर उपस्‍थिती होती.

    Post Views:  47


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व