अनैतिक मानवी वाहतुक कक्षाकडून गुन्हे व 18 मिसिंगसह 50 प्रकरणे उघडकीस
विश्वप्रभात न्यूज ब्युरो
15 May 2022, 1:18 PM
अकोला ः अनैतिक मानवी वाहतूक कक्षाने महिला व बाल अत्त्याचार प्रकरणातील तपासामध्ये माहे एप्रिलपासून आतापर्यंत 32 गुन्हे व 18 मिसिंग प्रकरणे अशी 50 प्रकरणे उघडकीस आणली आहेत.
पोलिस अधीक्षक जी. श्रीधर व सहा. अप्पर पोलिस अधिक्षीका मोनिका राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली महिला व बालअत्त्याराच्या अपराध कलम 363, 366 (अ) भादवी गुन्ह्यातील महिला मिसींगचे तपास करण्यात आले. त्यात पोलिस स्टेशन एम.आय.डी.सी.अकोला येथे दाखल झालेले अपराध क्र. 845/2021 चे प्रकरण प्रलंबित होते. सदर प्रकरणातील महिला हडपसर पूणे येथे असल्याची गुप्त माहिती मिळाल्यावरून अनैतिक मानवी वाहतूक कक्षाचे अधिकारी व अंमलदार यांनी पिडीत मुलीचा व आरोपीचा शोध घेऊन दोघांनाही संबंधित पोलिसांच्या ताब्यात दिले.
वरीष्ठांच्या मार्गदर्शनाखाली उपरोक्त कारवाई पोलिस निरीक्षक संजय खंदाडे, सहा. पोलिस निरीक्षक महेश गावंडे, पोलिस उपनिरीक्षक सुकेशनी जमधाडे, विजय खर्चे, पो.हे.कॉ. सुरज मंगरुळकर, धनराज चव्हाण, आशिष अघडते, करिश्मा गावंडे यांनी केली आहे. इतर गुन्ह्यांचाही शोध सुरू आहे.
Post Views: 178