संपत चाललेली लोकशाही वाचवण्यासाठी लोकांनी समोर आलं पाहिजे : प्रकाश पोहरे


लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचा विचारमंथन मेळावा संपन्न
 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  2023-03-28
   

अकोला - देशातील जनतेच्या समस्यांकडे दुर्लक्ष करून याविरूध्द बोलणारांचे आवाज बंद करून दडपशाहीच्या नीतिचा अवलंब केला जात आहे.न्यायव्यवस्थेचा वापर करून राहूल गांधींना अपिलात जाण्याचीही  संधीही न देता त्यांचे संसद सदस्यत्व रद्द करणे ही घटना लोकशाही संपल्याचे लक्षण आहे.लोकशाहीला संपविण्याच्या या विनाशकारी संकटाला सावरण्यासाठी लोकांनी आक्रमकतेने पुढे आलं पाहिजे असे आवाहन ज्येष्ठ पत्रकार,इंडीयन लॅंग्वेजेस न्यूजपेपर्स असोसिएशन ( ईलना) या सर्व भाषिक वृत्तपत्रांच्या राष्ट्रीय संघटनेचे कार्यकारी अध्यक्ष प्रकाशभाऊ पोहरे यांनी केले.लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ या समाजाभिमुख राष्ट्रीय संघटनेच्या १९ व्या नियमित मासिक विचारमंथन मेळाव्यात ते बोलत होते.हा कार्यक्रम त्यांचे अध्यक्षतेखाली आणि विनोदी कवी,चारोळीकार अॕड अनंतराव खेळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत अकोल्यात जठारपेठेतील जैन‌ रेस्ट्रो येथे संपन्न‌ झाला.याप्रसंगी ईलनाचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष म्हणून झालेल्या निवडीबद्दल लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाकडून प्रकाश पोहरे यांचा व साहित्त्यिक क्षेत्रातील यशस्वी वाटचालीबद्दल अॕड.अनंतराव खेळकर यांचाही  शाल,सन्मानपत्र व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. अकोल्यात रूग्णांची सर्वोपचार व ईतर रूग्णालयांतू‌न निरंतर सेवा करून इतरांनाही प्रोत्साहीत करणाऱ्या समाज व रूग्णसेवक उमेश इंगळे यांच्याही कार्याचा गौरव म्हणून लोकस्वातंत्र्यकडून त्यांचा सन्मानपत्र ,शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.त्याचप्रमाणे लोकस्वातंत्र्य च्या विदर्भ विभागीय संघटन तथा संपर्क प्रमुख  पदावर डॉ. विनय दांदळे यांची नियुक्ती जाहिर करून त्यांनाही अतिथी़च्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन अभिनंदन आणि स्वागत करण्यात आले. 
     लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे संस्थापक- राष्ट्रीय अध्यक्ष संजय एम.देशमुख,निंबेकर व केंद्रीय पदाधिकाऱ्यांच्या प्रमुख  उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व संत गाडगेबाबांच्या प्रतिमेला हारार्पण करून वंदन करण्यात.अॕड अनंतराव खेळकर यांनी आपल्या खुमासदार विनोदी शैलीमध्ये लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या वाटचाल व संघटनकार्याचे कौतुक करून शुभेच्छा व्यक्त केल्या.
       ‌‌ लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ ही पत्रकारिता आणि सामाजिक अशी संकल्पना घेऊन चालणाऱ्या राष्ट्रीय संघटनेला कोरोना काळातून स्थापनेला दोन वर्ष पूर्ण झाले असून दर महिन्याला घेतल्या जाणारा हा १९ वा विचारमंथन मेळावा होता.अशा कार्यक्रमांमधून  पत्रकार प्रश्न, मार्गदर्शन, कायदेविषयक मार्गदर्शन व विविध सेवाभावी उपक्रमांचे आयोजन असते.
       या कार्यक्रमाला केंद्रीय उपाध्यक्ष प्रदिपभाऊ खाडे,किशोर मानकर,केंद्रीय सचिव राजेन्द्र देशमुख,मार्गदर्शक पदाधिकारी प्रा.राजाभाऊ देशमुख,प्रा.डॉ.संतोष हूशे,अॕड.राजेश जाधव डॉ ‌विनय दांदळे, अंबादास तल्हार,नंदकिशोर चौबे,अकोला जिल्हाध्यक्ष मोहन शेळके,उपाध्यक्ष विवेक मेतकर,सौ.दिपाली बाहेकर,गौरव देशमुख,बुलढाणा जिल्हाध्यक्ष स्वप्निल देशमुख, सतिश देशमुख,निंबेकर,श्रीस्वर हूशे,मनोहर मोहोड,सतिश देशमुख,उगवेकर,सुरेश भारती ,पंकज देशमुख,रविन्द्र देशमुख,रवि पाटणे,विष्णू नकासकर, व अनेक पत्रकार सभासद उपस्थित होते.कार्यक्रमाचे संचलन सौ.दिपाली बाहेर यांनी तर आभार प्रदर्शन राजेन्द्र देशमुख यांनी केले.

    Post Views:  196


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व