अकोला, दि. २३ : जिल्ह्यातील युवकांमध्ये चांगली उद्यमशीलता व संशोधन क्षमता असून, योग्य संधी मिळाल्यास ते राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत स्पर्धा करू शकतात, असे जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी येथे सांगितले.
आंतरराष्ट्रीय मूकबधिर सप्ताहानिमित्त लर्न अँड एम्पॉवर या स्टार्टअपच्या संस्थापकांचा सत्कार जिल्हाधिकारी श्री. कुंभार यांच्या हस्ते नुकताच करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. उपक्रमाचे सहसंस्थापक व सीओओ प्रबोध महाजन, शुभंकर पोतदार, प्र.समाजकल्याण अधिकारी शरद पुंड, शासकीय मुकबधीर विद्यालयाच्या मुख्याध्यापिका अलका मोदक आदी उपस्थित होते.
संस्थेतर्फे कर्णबधीर बांधवांना शिक्षणासाठी मदत करण्यासाठी संवादात्मक शिक्षण अॅपची निर्मिती करण्यात आली. महाराष्ट्र स्टार्टअप यात्रा २०२२ मध्ये संस्थेला राज्यस्तरीय पारितोषिकही मिळाले आहे. या स्टार्टअपद्वारे रेझोनेट लर्निंग व साईनअसिस्टिव्ह प्लॅटफॉर्मचे सादरीकरण करण्यात आले. ही दोन्ही ॲप्लिकेशन्स मूकबधीर विद्यार्थ्यांना शिक्षणात सहाय्यकारी ठरू शकतील, असे संस्थेच्या प्रतिनिधींनी सादरीकरणात सांगितले.
Post Views: 156
सर्व
सर्व
admin@sanjay
admin@Sanjay