पुष्पराजभाऊ गावंडे व संदिप देशमुख यांचे संघटनाप्रेम ...!


नाशिक साहित्त्य संमेलनातही लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचा परिचय
 संजय एम‌.देशमुख  2021-12-13
   

अकोला-आपल्या लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे केन्द्रीय मार्गदर्शक तथा सल्लागार सदस्य,महा.शासनाच्या साहित्त्य व संस्कृती मंडळाचे सदस्य,कादंबरीकार श्री.पुष्पराजभाऊ गावंडे व केन्द्रिय पदाधिकारी,कवी,पत्रकार श्री.संदिप देशमुख हे आपल्या संघटनेचे साहित्त्यनगरीची ३ दिवसाची वारी करून आलेले साहित्त्य वारकरी आहेत.त्या साहित्त्य संमेलनात या दोघांनीही लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे ओखळपत्र अखंड गळ्यात ठेऊन साहित्त्य नगरीतही संघटनेचा प्रसार करण्याची भुमिका बजावलेली आहे,संघटनेप्रतीच्या त्या प्रेम आणि आदराबाबत दोघांचेही मन:स्वी अभिऩदन आणि धन्यवाद.....! ही माहिती युवा साहित्त्यिक निलेश कवडे यांनी काल मला दिली. संघटनशक्ती एकत्र दिसल्याने व वेळोवेळी तिचे अस्तित्व ईतरांना लक्षात येत राहते.त्यामुळे सतत सकारात्मक उर्जाशक्ती निर्माण होऊन संघटना तिच्या ताकदीच्या अस्तित्वशक्तीने सतत वाढत राहत असते.हे यशाच्या मार्गातील एक ईतिहाससिध्द सत्त्य आहे, ही गोष्ट प्रत्येकाने लक्षात ठेवण्यासारखी आहे‌.म्हणून आपल्याही कार्यक्रमामध्ये सर्वांनी नियमित कार्ड वापरले पाहिजेत.कारण त्याचा प्रभाव नविन सभासद म्हणून दाखल झालेल्या व सभासद होण्याचा विचार करत असणाऱ्या लोकांवर सतत होत असतो. तरीही अजूनही आपली बरीच मंडळी या सुचनेकडे दुर्लक्ष करून कार्ड वापरतांना दिसत नाही‌,ही एक खंत आहे. श्री संदिप देशमुख तर विश्वप्रभात वृत्तपत्राचे पत्र घेऊनच साहित्त्य संमेलनात पोहचल्याने त्यांनी तेथे विश्वप्रभातचेही प्रतिनिधित्व केलेले आहे.पूनश्च या दोघांचेही *मन:स्वी अभिनंदन आणि धन्यवाद*....!????????????????

   संजय एम‌.देशमुख
 संस्थापक-राष्ट्रीय अध्यक्ष

    Post Views:  223


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व