मुंडगावकर हुंडीचिठ्ठी घोटाळा तिघांना पीसीआर
अकोला : शहरातील बहुचर्चित मुंडगावकर ज्वेलर्स हुंडीचिठ्ठी घोटाळा प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने आतापर्यंत तिन आरोपींना अटक केली. या आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने तिन्ही आरोपींना 21 फेब्रुवारी पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
मुंडगावकर ज्वेलर्सने नागरिकांच्या विश्वासाचा गैरफायदा घेवून आरोपींनी कोट्यावधी रुपयांच्या रोख रक्कम व सोन्याच्या स्वरूपात ठेवी स्वीकारून नंतर आरोपी हे त्यांचे प्रतिष्ठाण बंद करून पळून गेले. यामध्ये आतापर्यंत एकूण २४३ गुंतवणकुदारांची १० कोटी २७ लाख ७६ हजार ७२४ रुपये एवढी फसवणूक केल्या संदर्भात तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.
आर्थिक गुन्हे शाखेचे प्रमुख पोलिस निरीक्षक विजय नाफडे यांनी विजय मुंडगावकर व सविता अमोल मुंडगावकर यांना अटक केली होती. त्यानंतर मंगळवारी रात्री तिसरा आरोपी मंगलसिंग चंदेल उर्फ राजू ठाकूर यांना अटक करण्यात आली. आज तिन्ही आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने 21 फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी ठोठावली आहे.
Post Views: 315